आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Personal Experience Of 2 Workers Rescued From Bilaspur Tunnel

234 तास बोगद्यात अडकलेल्या मजूरांनी कागद खाऊन काढले चार दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहेर आल्यानंतर हात उंचावून धन्यवाद देताना सतीश तोमर - Divya Marathi
बाहेर आल्यानंतर हात उंचावून धन्यवाद देताना सतीश तोमर
टिहरा (बिलासपूर) - हिमाचल प्रदेशातील टिहरा बोगद्यात अडकलेल्या दोन मजूरांना 234 तासांनी अर्थात दहा दिवसांनंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. देशातील हे सर्वात मोठे बचाव कार्य असल्याचे बोलले जात आहे. बोगद्यात अडकलेल्या सतीश तोमर आणि मनीराम यांनी आपबिती सांगितली आहे. जिवंत राहाण्यासाठी कागद खाऊन आणि साचलेले पाणी पिऊन चार दिवस काढल्याचा विदारक अनुभव त्यांनी कथन केला. त्यांना वाचवण्यासाठी एनडीआरएफच्या टीमने केलेले प्रयत्न सर्वात महत्त्वाचे होते. ह्रदयराम नावाचा आणखी एक मजूर अजून सापडलेला नाही, त्याचा शोध सुरु आहे.
मजूरांची आपबीती
बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बिलासपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येथील डॉक्टरांना त्यांनी सांगितले, 12 तारखेला आम्ही बोगद्यात अडकलो. त्यानंतर 16 तारखेपर्यंत आम्हाला अन्न मिळाले नाही. हे चार दिवस जीवन-मृत्यूच्या दरम्यानचे होते. आम्ही जिथे अडकलो होतो तिथे एक मशिन होते. त्यात एक वही पडलेली, त्या वहीचे पाने खाऊन आम्ही दोघे भूख भागवत होतो. बोगद्यात काही ठिकाणी पाणी झिरपत होते, त्याने आम्ही तहान शमवली. आम्ही अडकलो त्याठिकाणी पाणी भरायला लागले तेव्हा मशिनवर बसून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. चार दिवसांनंतर जेव्हा रेस्क्यू टीमने बोगद्याला छिद्रे पाडले त्यातून आमच्यापर्यंत प्रकाश पोहोचला. तेव्हा आमची जिवंत राहाण्याची आशा पल्लवित झाली.

जेव्हा ते दोघे म्हणाले - आमच्यासाठी तुम्ही देव आहात...
तीन दिवसांपूर्वी बचाव कार्यात अनेक अडचणी येत होत्या. पहिले ड्रिलिंग मशिनचा हायड्रो पाइप फूटला. यामुळे दिड दिवस काम थांबले होते. रविवारी दिल्लीहून त्याच्या दुरुस्तीची अवजारे आणण्यात आली. मशिन सुरु झाले तर चैन तुटली. त्यासोबतच रविवारी सुरु झालेल्या पावसामुळे काम थांबले. पुढील ड्रिलिंगसाठी छोटे मशिन मागवण्यात आले. सोमवारी सकाळी उपनिरीक्षक नरेश कुमार यांनी काही औजारांनी बोगद्याला कापले त्यामुळे बोगद्याच्या माथ्यावर आरपार होल करुन आत जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल अशोक कुमार आतमध्ये उतरले. तिथे तीन फूट पाणी साचले होते. अशोककुमार यांना पाहाताच मनीरामने त्यांना मिठी मारली आणि म्हणाले तुम्ही आमच्यासाठी देवासारखे धावून आलात.... आमच्यासाठी तुम्हीच देव आहात...
पुढील स्लाइडमध्ये पाहा, संबंधित फोटो