आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PETN Explosive Found Inside UP State Assembly, Yogi Adityanath Calls High Level Meeting

सुरक्षेत चूक : उत्तर प्रदेश विधानसभेत आढळले 150 ग्रॅम शक्तिशाली स्फोटके, NIA करणार तपास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ  - उत्तर प्रदेश विधानसभेच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक समोर आली आहे. सभागृहात विरोधी पक्षनेत्याच्या आसनाजवळ गादीच्या खाली १५० ग्रॅम शक्तिशाली स्फोटके ठेवल्याचे आढळले. १२ जुलै रोजी स्वच्छता सुरू असताना मिळालेली पावडर म्हणजे पेनाटेरीथ्रीटोल टेट्रानाइट (पीईटीएन) आहे, हे न्यायवैद्यक तपासणीत स्पष्ट झाले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी सभागृहात ही माहिती दिली. हे स्फोटक एवढे शक्तिशाली आहे की, ५०० ग्रॅम पावडरने संपूर्ण विधानभवन उडवले जाऊ शकते. योगी म्हणाले, “अखेर हे स्फोटक आत कोणी पोहोचवले, हा प्रश्न आहे. आमदारांना विशेषाधिकार असले म्हणून त्यांना सुरक्षेत सूट देणार का? ही धोकादायक प्रवृत्ती आहे.” मुख्यमंत्र्यांच्या मागणीवरून विधानसभा अध्यक्ष हृदयनारायण दीक्षित यांनी या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेमार्फत (एनआयए) तपास करण्याची घोषणा केली. सध्या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात देशद्रोहासह इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी लखनऊपासून ३२५ किलोमीटर अंतरावरील देवरिया येथून फरहान अहमद नावाच्या २० वर्षीय युवकाला अटक केली आहे. त्याने अतिरिक्त पोलिस महासंचालकांना (कायदा आणि सुव्यवस्था) मोबाइल फोनवर कॉल करून १५ ऑगस्टला विधानभवन उडवण्याची धमकी दिली होती. 
 
गरज भासल्यास आमदारांचीही चौकशी :  
सध्या दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या घटनेचा तपास करत आहे. एटीएसचे उपमहानिरीक्षक असीम अरुण यांनी सांगितले की, ज्या आसनाजवळ स्फोटक आढळले आहे त्याची ओळख पटली आहे. आवश्यकता भासली तर त्या आसनावर बसणाऱ्या आमदारासोबतच जवळपास बसणाऱ्या आमदारांकडेही चौकशी केली जाईल.  
 
मेटल डिटेक्टर, श्वानही पकडू शकत नाहीत पीईटीएन :  पीईटीएन म्हणजे पेनाटेरीथ्रीटोल टेट्रानायट्रेट खूप शक्तिशाली प्लास्टिक स्फोटक आहे.  मेटल डिटेक्टर आणि हुंगणारे श्वानही ते पकडू शकत नाहीत. ७ सप्टेंबर २०११ ला दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोटातही त्याचा वापर झाला होता. त्या हल्ल्यात १७ जण ठार, तर ७६ जण जखमी झाले होते. हे स्फोटक काळ्याबाजारात सहज उपलब्ध आहे.  
 
 
आता सुरक्षेचे नवे उपाय 
- विधानसभेच्या सर्व प्रवेशद्वारांवर पीएसीचे जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी) तैनात असेल. सर्व प्रवेशद्वारांवर फुल बॉडी स्कॅनर लावले जाईल.  
- सर्व आमदार आणि त्यांच्या प्रतिनिधींना जारी केलेले प्रवेश पास रद्द केले जातील. प्रत्येक आमदाराला फक्त एकच पास दिला जाईल.  
- सर्व आमदारांच्या चालकांचीही पडताळणी होईल. पासशिवाय कोणालाही विधानसभा परिसरात प्रवेश मिळणार नाही.  
- माजी आमदार आणि इतर लोकांना जारी केलेले पास रद्द होतील. विधानसभा सचिवालय कर्मचाऱ्यांचीही पोलिस पडताळणी केली जाईल.  
- एटीएसचे एक पथकही विधानसभेच्या आत राहील.  
 
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, योगींनी 8 मुद्द्यांवर दिले चौकशीचे आदेश 
1 - सर्व कर्मचाऱ्यांची पोलिस चौकशी झाली पाहिजे. 
2 - सुरक्षेसबंधी नव्या गाईडलाइनल तयार करण्यात येतील.
3 - NIA समकक्ष संस्थेकडून याची चौकशी होईल.
4 - कोणीही सभागृहात फोन घेऊन येणार नाही, असेल तर तो सायलेंट मोडवर ठेवावा.
5 - पास असल्याशिवाय विधानसभेत कोणालाही प्रवास नाही.
6 - सुरक्षा अधिकारी हे जबाबदार आणि उत्तरदायी असतील.  
7 - सुरक्षेचे नियम सर्वांसाठी सारखे असले पाहिजे. 
8 - विधानसभा सदस्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना पूर्ण सहकार्य करावे.
 
सभागृहात काय म्हणाले योगी 
 - आमदार आणि मार्शल्स यांच्याशिवाय कोणीही तपासणी झाल्याशिवाय सभागृहात येत नाही. आपल्याला यंत्रणा तयार करावी लागेल. विमानतळावर तपासणी करण्यास आपल्याला काही आक्षेप नाही तर येथेही सहकार्य करावे. आमदारांनी मोबाइल फोन आत आणू नये. बॅगही बाहेर ठेवावी.’  
 
काय असते PETN स्फोटक
1- पेंटाएरिथ्रीटल ट्रायनाइट्रेट अर्थात PETN हे अतिशय शक्तीशाली प्लास्टिक स्फोटक आहे. हे व्हाइट पाऊडर दहशतवादी, नक्षलवादी यांच्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. याच्या लोकप्रियतेचे कारण ब्लॅक मार्केटमध्ये हे सहज उपलब्ध असून चेक पॉइंटवर हे पकडले जाण्याचा धोका सर्वात कमी आहे. 
2- भारतात 7 सप्टेंबर 2011 मध्ये दिल्ली हायकोर्टात झालेल्या स्फोटात PETN चा वापर करण्यात आला होता. या स्फोटात 17 लोक मारले गेले होते आणि 76 जखमी झाले होते. चौकशीत समोर आले होते की PETN चा फार कमी वापर करण्यात आला होता. 
3 - हे स्फोटक पकडले जाण्याची शक्यता फार कमी असते. हे मॉलिक्यूल्स असल्यामुळे मेटल डिटेक्टरमध्ये पकडले जात नाही आणि गंधहिन असल्यामुळे स्निफर डॉगलाही त्याला पकडणे अवघड होते.  
4 - तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केवळ 100 ग्रॅम पाऊडर एक कार उडवण्यासाठी पुरेशी असते. एवढे शक्तीशाली हे स्फोटक आहे. 
 
पुढील स्लाइडमध्ये, सभागृहात खणाणला मोबाइल...
बातम्या आणखी आहेत...