आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायलिन वादळ शमले; ओडिशात 21, आंध्र प्रदेशात दोघांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोपालपूर/श्रीकाकुलम/नवी दिल्ली - फायलिन या महाभयंकर समजल्या जाणार्‍या वादळाच्या वाटचालीबद्दल शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेले अचूक अंदाज, वेळोवेळी दिलेली माहिती आणि देशात राबवण्यात आलेले सर्वांत मोठे बचाव कार्य या बळावर भारताने महावादळाचा सर्मथपणे मुकाबला केला. मोठी जीवितहानी टाळण्यात यामुळे यश आले. रविवारी सकाळपर्यंत ओडिशात वादळी वारे होते. ताशी 220 किमी वेगाने वारे होते. यामध्ये 23 लोक मृत्युमुखी पडले. आंध्र प्रदेशात दोघांचा मृत्यू झाला. ज्या भागातून महावादळाचा मार्ग होता तेथे एकाही घराच्या खिडक्यांना काचा राहिल्या नाहीत. एकाही शेतात पीक राहिलेले नाही. नारळाची झाडे उन्मळून पडली. प्राथमिक अंदाजानुसार 2400 कोटींचे पीक नष्ट झाले. आंध्र प्रदेशात फक्त किनारपट्टीच्या भागात प्रचंड नुकसान झाले. आता बिहारमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वार्‍यांचा इशारा वेधशाळेने दिला आहे.


तीन दिवस परिणाम
1 वादळ मंदावले असून त्याची वाटचाल बिहार, छत्तीसगड आणि झारखंडच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे या भागांत मुसळधार पावसाची शक्यता.
2 या भागातील कोसी आणि गंडक नद्यांना पुराचा धोका. प. बंगालमध्येही पुराची शक्यता.
3 कोलकात्याहून चीनला निघालेले एक मालवाहू जहाज बुडाल्याची भीती. तटरक्षक दलाने चालक दलाला वाचवले.

कुठे, किती नुकसान?
0ओडिशात 5 लाख हेक्टर शेती पाण्यात
012 जिल्ह्यातील 14 हजार 514 गावे प्रभावित
02.34 लाख कच्च्या घरांना नुकसान, अनेक घरे कोसळली
0वादग्रस्त जिल्ह्यात मोबाइल टॉवर्स कोसळल्याने नेटवर्क ठप्प
0आंध्रात किनारपट्टीच्या भागांत नुकसान, उर्वरित सुरक्षित

ओडिशात 21, आंध्र प्रदेशात दोघांचा मृत्यू
10.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
90 लाख लोक दोन्ही राज्यांत प्रभावित
2400 कोटी रुपयांच्या पिकांचे नुकसान