आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएचडीच्या स्टुडंटने विद्यापीठात घेतली फाशी, लिहून ठेवली अशी 16 पानी चिठ्ठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेरठ - उत्तर प्रदेशातील सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठात पीएचडीच्या एका विद्यार्थ्याने फाशी घेऊन आत्महत्या केली. त्याचा मृतदेह होस्टेलच्या खोलीत पंख्याला लटकलेला आढळला. आत्महत्येच्या या घटनेने विद्यापीठात खळबळ उडाली होती. मृत विद्यार्थ्याच्या खोलीत त्याच्या डायरीमध्ये 16 पानी सुसाइड नोट आढळली, ज्यात त्याने विद्यापीठातील एका प्राध्यापकावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे.
पुढे वाचा... काय होते सुसाइड नोटमध्ये...
 
- होस्टेलचे केअरटेकर अविनाश यांनी खोलीचा दरवाजा ठोठावला, आवाज दिला पण आतून काहीच उत्तर आले नाही. त्यांनी खोलीच्या मागच्या बाजूने खिडकीतून पाहिल्यावर त्यांना पंख्याला लटकलेला राहुलचा मृतदेह आढळला.  त्यांनी त्वरित याची माहिती कुलपति प्रा. गया प्रसाद आणि इतर अधिकाऱ्यांना दिली. 
- सूत्रांनुसार, राहुल मागच्या आठवडाभरापासून मानसिक तणावात होता. त्याचे संशोधन पूर्ण होत नसल्याबद्दल तो प्राध्यापकांना जबाबदार असल्याचे सांगत होता.
- घटनेची माहिती मिळताच सीओ आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण इतर विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला.
- नंतर पोलिसांनी कशीबशी विद्यार्थ्यांची समजूत घालून दरवाजा तोडला आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
- यूपीच्या शामली जिल्ह्यातील ऊन गावाचा रहिवासी राहुल चौधरी (25) कृषी विद्यापीठात प्राध्यापक राजबीर यांच्या मार्गदर्शनाखाली अॅग्रोनॉमीमध्ये पीएचडी करत होता. तिथे तो विद्यापीठाच्या हरगोविंद खुराणा होस्टेलमध्ये राहत होता.
- सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेला आढळला. खोलीत एक चिठ्ठीही होती ज्यात आत्महत्येला कारणीभूत प्रा. राजबीर यांनी केलेल्या छळाचा उल्लेख होता.
 
प्राध्यापकांना म्हणाला होता, माझा जीव जाईल सर
- राहुलच्या मृत्यूवर गदारोळ माजवणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुलपती आणि सीओंसमोर म्हटले की, राहुल खूप परेशान होता. 5 दिवसआधीच त्याने आपल्या मार्गदर्शकांना म्हटले होते की, सर मी खूप त्रस्त आहे, माझी मदत करा. माझे संशोधन पूर्ण होऊ द्या, नाहीतर माझा जीव जाईल.
विद्यार्थी म्हणतात की, प्राध्यापकांनी जर त्याचे ऐकले असते, तर त्याने आत्महत्या केली नसती.
 
या आशयाचा होता मजकूर
- राहुलने आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले की, या विद्यापीठात पहिल्यांदा आलो तेव्हा मी खूप खुश होतो. येथे येण्याच्या काही दिवसांनीच कळले की अॅग्रोनॉमी विभागातील दोन टीचर जाट जातीच्या विद्यार्थ्यांना पसंत करत नाहीत. त्यांची नावे त्याने डॉ. आर.बी. यादव आणि डॉ. राजबीर सिंह असल्याचे सांगितले आहे.
तपासासाठी समिती गठित
या प्रकरणावरून उडालेल्या गदारोळामुळे कुलपती प्रा. गया प्रसाद यांनी तत्काळ प्रभावाने प्रा. राजबीर सिंह यांना निलंबित केले आहे.
- पूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी डीएन एन. एस. राणा यांच्या नेतृत्वाखाली एक 6 सदस्यीय समिती गठित केली आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, राहुलने लिहिलेल्या सुसाइड नोटचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...