आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photographer Showed Life Of Widow Womens By Her Sahdow

मॉडेल बनली विधवांची सावली, फोटोग्राफरने दाखवल्या वेदना, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधवा आपल्या वेदना दूर करण्यासाठी सकाळी लवकर उठून पुजा, ध्यान करते. दुसरी विधवा महिलाही प्रार्थना करते आहे. तर त्यांची सावली (पिवळ्या साडीत) लग्नानंतर सासरी चांगले दिवस जावे म्हणून देवाकडे प्रार्थना करत असते. - Divya Marathi
विधवा आपल्या वेदना दूर करण्यासाठी सकाळी लवकर उठून पुजा, ध्यान करते. दुसरी विधवा महिलाही प्रार्थना करते आहे. तर त्यांची सावली (पिवळ्या साडीत) लग्नानंतर सासरी चांगले दिवस जावे म्हणून देवाकडे प्रार्थना करत असते.
वाराणसी - सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर केंद्र सरकार वृंदावनमध्ये एक हजार विधवांना राहण्यासाठी घर तयार करणार आहे. त्यासाठी 57 कोटींचे बजेट ठरवण्यात आले आहे. ही घरे डिसेंबर 2017 पर्यंत तयार होतील. मात्र वाराणसीत ललित घाटावर अशा अनेक विधवा आहेत ज्या, मोक्ष मिळवण्यासाठी याठिकाणी प्रतिक्षा करत आहेत.

विधवा आणि सौभाग्यवती यांची तुलना
फोटोग्राफर विनय त्रिपाठी यांनी आर्ट स्टुडंट राजेश्वरी हिच्या मदतीने फोटो अल्बम शूट केला. त्यांनी सांगितले की 'अस्क' नावाच्या या फोटोशूटमध्ये एक विधवा महिला आणि एक सौभाग्यवती महिला यांची तुलना करत एकाच वेळी दोघींचे आयुष्य कशा प्रकारे पुढे सरकत असते हे दाखवले आहे. यात विधवा महिलेबरोबर पिवळ्या साडीतील एका महिलेचे कॅरेक्टर आहे. ते त्या विधवेच्या जीवनाचे प्रतिबिंब असते.

हॉलीवूड चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी
विनय यांनी Feast of Varanasi या हॉ़लीवूडपटाची सिनेमॅटोग्राफी केली आहे. कान फिल्म फेस्टीवलसाठीही या चित्रपटाची निवड झाली आहे. चित्रपटात बनारसचे घाट, गंगा आणि मंदिरे अत्यंत सुंदर दाखवण्यात आली आहेत. त्यांना बाहेर जाऊन काम करण्यासाठी 10 लाख रुपयांची ऑफरही दिली होती. पण फोटोग्राफीची आवड असल्याने त्यांनी नकार दिला.

आईची 40 वर्षे जुनी साडी वापरली
2013 मध्ये त्यांनी त्यांच्या आईची साडी एका भाडेकरूला नेसायला दिली होती. त्यावर केलेल्या फोटोशूटला त्यांनी 'बोल्ड एंड ब्यूटीफुल' नाव दिले होते. परदेशात त्याचे चांगलेच कौतुक झाले होते. त्यात मातृत्वाचे सौंदर्य आणि स्त्रीचे सौंदर्य याचे फ्युजन होते.

पुढी स्लाइड्सवर पाहा, PHOTOS आणि त्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या विधवांच्या वेदना...