आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तवायफांना मॉडेल बनवून हा राजा काढत होता फोटो, दाखवले त्या काळातील सौंदर्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराज रामसिंह यांना फोटोग्राफीचा छंद होता. तवायफांना मॉडेल बनवू ते फोटो घेत होते. - Divya Marathi
महाराज रामसिंह यांना फोटोग्राफीचा छंद होता. तवायफांना मॉडेल बनवू ते फोटो घेत होते.
जयपूर - महाराज जयसिंह तृतीय यांच्या मृत्यूनंतर रामसिंह द्वितीयचा जन्म 1835 मध्ये झाला. त्याच वर्षी नवजात रामसिंहला गादीवर बसवण्यात आले होते. रामसिंह मोठे होत होते, तसे त्यांनी राज्य कारभारात अनेक बदल घडवून आणले. त्यासोबत जयपूरला बदलत्या काळासोबत आधुनिक शहर करण्याचेही प्रयत्न केले होते. रामसिंह यांना फोटोग्राफीचा मोठा छंद होता. ते कोठ्यांवरील महिलांना मॉडेल म्हणून उभे करत आणि फोटोग्राफी करत होते. रामसिंह यांना नव्या काळासोबत चालण्याची आवड होती. 
 
(का आहेत चर्चेत: रामसिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1835 मध्ये झाला तर त्यांचा मृत्यू 17 सप्टेंबर 1880 साली झाला होता. 17 सप्टेंबरला त्यांची पुण्यतिथी झाली तर 27 सप्टेंबरला जयंती साजरी होणार आहे. यानिमित्ताने divyamarahti.com जयपूर राजघराण्यासंबंधीचे काही रोचक किस्से सांगत आहे.)
 
'तवायफ' महिलांचा साज-श्रृगांर करुन करत होते फोटोग्राफी 
- गीत संगीताची आवड असलेल्या रामसिंह यांना एकूण नऊ महाराणी होत्या. त्यातील दोन रीवाच्या होत्या. 
- रामसिंह यांचा पहिला छंद हा फोटोग्राफी होता. 
- जगात जसजसे नवीन कॅमेरे येत होते ते खरेदी करण्याचा रामसिंह यांचा छंद होता. विविध प्रकारचे कॅमेरे खरेदी करुन त्यांनी स्वतःचा जणू स्टुडिओ निर्माण केला होता. त्याला ते फोटोखाना म्हणत, त्याच्या देखरेखीसाठी त्यांनी एक मुख्य फोटोग्राफर नियुक्त केला होता. 
- महाराज निवांत वेळ असेल तेव्हा तवायफांचा साज-श्रृगांर करुन त्यांचे फोटो काढत असायचे. त्यात गौहर खान नावाही एक तवायफ त्यांच्या खास मर्जीतील होती. 
- तवायफांचे नाच-गाणे करतानाचे असंख्य फोटो रामसिंहांनी घेतले होते. त्यासोबतच जयपूरमधील विविध भवनांचे फोटो, जयपूरचे विहंगम दृष्य त्यांनी कॅमेरात कैद केले होते. 
- ठाकूर, सरदार, जमीनदार यांचेही फोटो ते काढायचे. विदेशी पर्यटकांना महालात उभे करुन त्यांचे फोटो काढून ते त्यांना भेट देत होते. यामुळे विदेशात जयपूरचे नाव पर्यटक नगरी म्हणून लवकरच प्रसिद्ध झाले. 

रामसिंहांचे मोठे काम 
- रामसिंह यांनी ऐतिहासिक जयपूर शहराला आधुनिक करण्याचा विडा उचलला होता. 
- रामसिंह यांनी त्यांच्या कार्यकाळात एक संपूर्ण इंजिनिअरिंग विभागच सुरु केला. 1875 मध्ये वॉटर वर्क्स, 1878 मध्ये गॅस लाइट आणि त्यानंतर विकासाच्या या पर्वात त्यांनी मेयो हॉस्पिटल, दुष्काळी कामांतर्गत रामनिवास बाग, म्यूझियम, स्कूल ऑफ आर्ट्स, त्रिपोलिया येथील सार्वजनिक वाचनालय, रामप्रकाश रंगशाळा, महाराजा कॉलेज (1844), संस्कृत स्कूल (1865), गोनेर येथील नोबल्स स्कूल (1862) हे सर्व सुरु केले. 
- एवढेच नाही तर जयपूर ते अजमेर आणि जयपूर ते आग्रा हा महामार्गही तयार केला. 
 
चार लाख खर्चून तयार केली बाग 
- जयपूरमध्ये प्रिन्स अलबर्ट येणार होते. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ रामसिंह यांनी अलबर्ट हॉल बांधला. हा प्रिन्स अलबर्ट हॉल आजही जयपूरची शान म्हणून ओळखला जातो. 
- अलबर्ट हॉलचा नकाशा इंग्रजांचे चीफ इंजिनिअर सर स्वॅन्टन जेकब यांनी तयार केला होता. नंतर अलबर्ट हे किंग अॅडवर्ड सातवे झाले होते. 
- रामसिंह यांनी रामबाग पॅलेस बांधला आणि त्याला विशाल रुप दिले. 
- त्या काळात सिनेमा आणि नाटक नव्हते तेव्हा संगीत-नृत्य प्रेमी रामसिंह यांनी तिथे एक रंगशाळा सुरु केली. तो तेव्हाचा सर्वात सुंदर रंगमंच होता. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रामसिंह यांनी काढलेले फोटोज्... 
बातम्या आणखी आहेत...