आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Local People Home After Disaster In Uttarakhand Due To Monsoon

अकराव्या दिवशी पहिला सामूहिक अंत्यविधी, आंध्रच्या नेत्यांमध्ये श्रेयासाठी हाणामारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - उत्तराखंडमधील प्रलयानंतर 11 व्या दिवशी बुधवारी केदारनाथमध्ये सामूहिक अंत्यविधीला सुरुवात झाली. शवविच्छेदन आणि डीएनए नमुने घेण्यात आल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी काही मृतदेहांवर विधिवत अंत्यसंस्कार केले. दरम्यान, चितेसाठी लाकडे पोहोचवून परतताना कोसळलेल्या हेलिकॉप्टरमधील 17 शहीद जवानांचे मृतदेह हाती लागले आहेत. हवाई दलप्रमुख एनएके ब्राऊन यांनी गोचर येथे जाऊन जवानांची भेट घेतली. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचा कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर व फ्लाइट डाटा रेकॉर्डर मिळाला आहे. तपासात त्याची मदत होणार आहे.
5 हजार अडकलेले, रोगराईचे संकट
उत्तराखंडच्या वेगवेगळ्या भागांत अजूनही 5 हजार लोक अडकलेले आहेत. सर्वाधिक 4 हजार लोक बद्रीनाथमध्ये, तर हरसिल येथे एक हजार लोक आहेत. या भागात साथरोगांचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे. लष्कराच्या आरोग्य केंद्रात ताप आणि उलटी होत असल्याच्या तक्रारी घेऊन लोक येत आहेत. केदारनाथमध्ये बचावकार्य करणारे काही जवानही आजारी पडले आहेत.
पर्यटनाला जबर फटका
सन 2013-14 या वर्षात पर्यटन व्यवसायातून उत्तराखंडला 25 हजार कोटींचा महसूल मिळाला असता. त्यापैकी पहिल्या तीन ते चार महिन्यांत 5 ते सहा हजार कोटींचा महसूल मिळाला आहे. परंतु महत्त्वाच्या पर्यटन ठिकाणांनाच महापुराचा फटका बसल्यामुळे राज्याला पर्यटनातून येत्या चार महिन्यांमध्ये केवळ पाच ते सहा हजार कोटींचा महसूल मिळेल अशी अपेक्षा आहे, असे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्यकारी संचालक सौरभ सांन्याल यांनी सांगितले