रायपूर - हे पेंटिंग विलासपूर रेल्वे विभागाच्या नागपूर विभागीतील टीटीई विजय बिस्वाल यांनी तयार केले आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमात या पेंटींगचा उल्लेख केला होता. विजय यांच्या मते कलाकारांना फार संघर्ष करावा लागतो, त्यांचे हे दुःख पंतप्रधानांपर्यंत पोहोचावे. ते यात काही करतील असा अशावाद विजयला आहे.
पंतप्रधान म्हणाले
काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याबद्दल माहिती मिळाली. नागपूर विभागातील विजय बिस्वाल नावाचे एक टीटीई आहेत. त्यांनी रेल्वेलाच आपले दैवत मानले आहे आणि रेल्वेतच ते नोकरी करतात. रेल्वेच्या प्रवासात फिरत फिरतच ते पेंटिंग करत असतात. तुम्ही कोणतेही काम करत असले तरी तुमच्या अंगभूत कलेला तुम्ही जपले पाहिजे, ते कसे हे विजय यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.
कोरबाच्या पेंटिंगने मिळाली प्रसिद्धी
विजय यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले, की त्यांनी हे पेटिंग कोरबा येथील दृष्य कॅनव्हासवर उतरवले आहे. या पेटिंगनेच त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली. विजय मुळचे ओडिशाचे आहेत आणि नोकरीच्या निमीत्ताने नागपूर विभागाला जोडले गेले आहेत. त्यामुळे नागपूर ते राजनांदगाव, रायपूर, बिलासपूर, कोरबा आणि छत्तीसगडच्या इतर शहरांमध्ये प्रवास करावा लागतो. यादरम्यान असे अनेक दृष्य मनात कोरले जातात तेच रंग रेषांच्या माध्यमातून कागदावर उतरवतो आणि मनातील काही भावना सांगण्याचा प्रयत्न करतो. 2011 मध्ये भाटापारा येथील रेल्वे स्टेशनवर रेल्वेला उशिर असताना पहिले पेटिंग तयार केले. त्यानंतर हा नित्यक्रमच होऊन गेला. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. एका पेटिंगला वेबसाइटवर चार लाख लाइक्स मिळाले होते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मन की बातशी संबंधीत काही फोटोज्...