आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंडामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; मृतदेहाच्या हाताची बोटे कापून लांबवल्या अंगठ्या!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून- चारधाम यात्रेसाठी उत्‍तराखंडला आलेल्या नोएडा येथील देवव्रत कुटूंबिय नैसर्गिक प्रकोपाच नव्हे तर चोरट्यांच्या अमानवीय लालसेचेही शिकार झाले आहे. उत्तरखंडात झालेल्या ढगफुटीच्या विध्वंसात देवव्रत यांच्या आईचे निधन झाले होते. चोरट्यांनी देवव्रत यांच्या आईच्या मृतदेहावरील दागिने ओरबडून घेतले. गळ्यातील साखळी, कानातील झुमके एवढेच नाही तर हाताची बोटे कापून तीन अंगठ्याही लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

उत्तराखंडात आलेल्या महाप्रलाय नऊ दिवस उलटली असताना परिस्थिती अद्याप बिकटच आहे. नैसर्गिक प्रकोपात पाच हजारांहून अधिक लोक मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जात असताना तेथे साधूंच्या रुपातील चोर्‍यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चोरटे हे नेपाळ्यांसारखे दिसत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. अनेक मृतदेहावरील दागिने त्यांनी आतापर्यंत लांबविले आहेत. काही चोरटे तर मृतदेहांचे अवयव कापून दा‍गिन्यांवर आपला हात फिरवत आहेत.

उत्तराखंडमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे अत‍िदुर्गम भागांत अडकलेल्यांचे काय होणार, याची सर्वांना चिंता आहे. तथापि, कोणत्याही परिस्थिती बचावकार्य थांबणार नाही, अशी प्रतिज्ञाच जणू भारतीय लष्कराने केली आहे. अडकून पडलेल्यांचे तर हालच आहेत. जागोजागी विखुरलेले मृतदेह व आठ दिवसांपासून अन्न-पाण्याविना असलेल्या नागरिकांचा श्वास गुदमरतोय. मृतदेह अक्षरश: कुजत असल्याने रोगराईचा मोठा धोका आहे.

महाप्रलयानंतर आता उत्तराखंडमध्ये लुटमार होताना दिसत आहे. नेपाळीसारखे दिसणारे साधू मृतदेहावरील दागिने लांबवताना दिसत आहे. ‍केदारनाथ म‍ंदिरसह परिसरात विखूरलेल्या मृतदेहांवरील दागिने लंपास झाल्याने लष्कर अधिकार्‍यांनी सांगितले आहे. खिशातीलही रुपये काढून घेण्यात आले आहेत. त्यामुळे बचाव कार्यात व्यस्त असलेल्या एनडीआरएफ आणि आयटीबीपीच्या जवानांसमोर नवे आव्हान उभे राह‍िले आहे. काही चोरट्यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून जवळपास एक कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... 'उत्तराखंडमधील पूरग्रस्तांच्या मदतला सरसावले कचरा वेचणारी मुले'