आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'भारत माता की जय\' न म्हणणारे ओवेसी याचिका दाखल होताच म्हणाले \'जय हिंद\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद/लखनौ- अलाहाबाद हायकोर्टात ऑल इंडिया मजलिस-इत्तेहादुल-मुसलमिन (एमआयएम) या पक्षाचे अध्‍यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात मंगळवारी जनहीत याचिका दाखल करण्यात आली आहे. ओवेसींवर देशद्रो‍हाचा आरोप ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, लखनौच्या सीजेएम कोर्टातही ओवेसींविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.
अलाहाबादमध्ये भादंवि 124 अ नुसार दाखल झालेल्या जनहीत याचिकेवर ओवेसी म्हणाले, 'न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास आहे. कोर्टच योग्य न्याय देईल, जय हिंद!'

काय आहे तक्रार?
- ओवेसींची रविवारी महाराष्‍ट्रातील लातूर जिल्ह्यातील उडगीरमध्ये एक सभा घेतली.
- हवं तर माझ्या मानेवर सूरी ठेवा, पण मी 'भारत माता की जय' म्‍हणणार नाही,असे ओवेसींनी भाषणात म्हटले होते.
- ओवेसींच्या भाषणाचा व्हिडिओ सोमवारी समोर आला.

आणखी काय म्हणाले ओवेसी?
- 'भारत माता की जय' म्हणणे आवश्यक असल्याचे अापल्या राज्यघटनेत कुठेच नमुद करण्यात आलेले नसल्याचेही ओवेसी म्हणाले. त्यामुळे 'भारत माता की जय' असे वदवून घेण्यासाठी कोणीही जबरदस्ती करू शकत नसल्याचेही ओवेसी यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइडवर व्हिडिओत बघा काय म्हणाले ओवेसी... सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्‍तव्‍याला दिले ओवेसींचे प्रत्युत्तर...
बातम्या आणखी आहेत...