आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गया तीर्थक्षेत्री श्राद्धाचे १७ दिवस दिवाळीच, ५ लाख लोक, हजारो घरांना येते हॉटेलचे रूप!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया - गयामध्ये सध्या ‘डिस्काउंट बंद’ अशा पाट्या हॉटेलबाहेर दिसतात. या काळात हॉटेल कंवा धर्मशाळांत सहज खोली मिळणे कठीणच. सर्व छोट्या-मोठ्या हॉटेलच्या काउंटरवर ‘खोली शिल्लक नाही’ अशा पाट्या. तरीही यातून होणारी कमाई पाहता अनेक हॉटेल अिधक भाडे आकारून अितरिक्त बेडची व्यवस्था करतात हा भाग निराळा. अनेक लोक खासगी घरांतील खोल्या १७ दिवसांसाठी किरायाने घेतात. किराया पण अव्वाच्या सव्वा असतो.
... याचे कारण म्हणजे गयेत सध्या सर्वात मोठ्या सणाचा काळ आहे. भलेही पितृपक्षात देशभर शुभकार्य टाळले जाते. गयेत मात्र जणू उत्सव असतो. येथील लोक पितृपक्षाची आतुरतेने वाट पाहत असतात. याचे कारण म्हणजे या काळात होणारी उलाढाल. छोटी टपरी चालवणाऱ्यापासून साहित्य विक्री करणाऱ्यांपर्यंत सर्वांचीच यात कमाई होते. पितृपक्षात गयेमध्ये १५० ते २०० कोटींची उलाढाल होते. या काळात देश आणि जगभरातून सुमारे ५ लाख लोक येथे येतात.
या काळात शहरही अगदी स्वच्छ केले जाते. रस्त्यांची दुरुस्ती, वीज-पाणी तसेच सांडपाण्याची व्यवस्था चोख असते. या काळात श्राद्धासाठी लागणाऱ्या साहित्याची प्रचंड विक्री होते. यात काळे तीळ, पूजेचे साहित्य, धोतर, साडी, फळे, मिष्टान्न, उदबत्ती, धूप, तूप अशा वस्तूंचा समावेश असतो. पावलापावलावर ही दुकाने सजलेली असतात. गर्दीही प्रचंड असते. फुले कोलकात्याहून येतात. या शहराचे इतर क्षेत्रातही खूप नाव आहे. गायनक्षेत्रातील गुलाबबाई याच गावातून नावारूपाला आल्या. जवळच ईश्वरीपूर हे गाव कलाकारांचे गाव म्हणून ओळखले जाते. दुसऱ्या एका पथ्थरकट्टी गावात पाषाणातून कोरीव मूर्ती घडवणारे लोक राहतात. आणखी एक कनेर नावाचे गाव पितळाच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. पटवा टोली नावाचे दुसरे गाव म्हणजे मँचेस्टरच. कारण येथून सर्वाधिक आयआयटीयन बाहेर पडतात. अशा गया गावचे महत्त्व जगभर जणू मान्यच झाले आहे. िपतरांना मोक्ष मिळावा म्हणून या पवित्र गावात येऊन श्राद्ध करण्याची प्राचीन परंपरा आजही टिकून आहे. तेवढ्याच श्रद्धेने लोक येथे येऊन विधी करतात.
बातम्या आणखी आहेत...