जम्मू - अमरनाथ येथील शिवलिंगाच्या दर्शनासाठी जम्मूहून शनिवारी शेवटचा जथ्था पोलिस बंदोबस्तात रवाना झाला. भाग्यवती कॅम्पमध्ये सर्व ८९ भाविकांची उपस्थिती होती. पहाटे पावणेतीनच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात हे भाविक वाहनांद्वारे दर्शनासाठी रवाना झाले.
त्यांनी जवाहर बोगदा पार केला.
या जथ्थ्यामध्ये १६ महिला आणि ३७ साधू होते, असे सूत्रांनी सांगितले. यातील ५६ भाविकांनी पहलगाममार्गे जाण्याचा निर्णय घेतला. छडी मुबारक नंतर ही यात्रा अंतिम टप्प्यात आली असल्याचे मानले जाते. या मार्गावर भक्तीमय वातावरण दिसून येत होते. यात्रेचा समारोप ७ ऑगस्ट रोजी होत आहे. २९ जून रोजी अमरनाथ यात्रेस प्रारंभ झाला होता.