आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉलिंगकाँग चौकीच्या माध्यमातून आदिकैलास यात्रेकरूंना सुरक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदिकैलास - जॉलिंगकाँग (जि. पिठोरागड, उत्तराखंड) येथे १६ जून २०१५ रोजी इंडो तिबेट बॉर्डर पोलिस दलाची चौकी तैनात केल्याने आदिकैलास जाणाऱ्या यात्रेकरूंची सुविधा झाली आहे. उपरोक्त यात्रेस चौकीच्या स्थापनादिनीच प्रारंभ झाला आहे. सुमारे सतरा हजार फुट उंचीवर चौकी उभारल्याने सुरक्षेसह इतर अडचणी दूर झाल्या आहेत.

कैलासमानसरोवर व आदिकैलास यात्रांना जूनमध्ये प्रारंभ झाला. दोन्ही यात्रा ३१ ऑक्टोबरपर्यंत चालतात. मानसरोवर विदेशात तर आदिकैलास भारतात आहे. कुमाऊ मंडळ विकास निगम दोन्ही यात्रांचे संचालन करते. आयटीबीपीचे पोलिस उपनिरीक्षक संजय खाली यांनी सांगितले की, मानसरोवराइतकेच महत्त्व आदिकैलास यात्रेचे आहे. केवळ सुविधांअभावी आदिकैलास यात्रा काहीशी दुर्लक्षित राहिली. सुमारे अठरा हजार फूट उंचीवर दुर्गम पहाडावर पर्यटकांना चढाई करावी लागते. जॉलिंगकाँग ही चौकी आदिकैलासच्या पायथ्याशी आहे. त्यापुढे ३ कि. मी. अंतरावर वेगवेगळ्या दिशांना गैारीकुंड आणि पार्वती कुंड आहे. गाैरीकुंड कायम बर्फाने झाकलेले असते. तर पार्वतीकुंड एप्रिल ते ऑक्टोबर कालावधीत खुले असते. भारत तिबेट सीमेवर आयटीबीपी तैनात आहे. आतापर्यंत जॉलिंगकाँग पूर्वी १८ कि. मी. अंतरावरील कुटी या गावात आयटीबीपीची चौकी (बीआेपी) होती. १६ जूनपासून जॉलिंगकाँग येथे चौकी सुरू करण्यात आली. ही चौकी केवळ सहा महिन्यांसाठी असून, नोव्हेंबर ते एप्रिल ही चौकी कुटी येथे स्थलांतरीत होईल. जॉलिंगकाँगच्या पुढे १८ कि. मी.वर चीनची सीमारेषा आहे. जॉलिंगकाँग चौकी महत्त्वपूर्ण असून, यात्रेकरूंसह भारताची सीमा यामुळे अधिक सुरक्षित झाली आहे.
आदिकैलाससाठी येणाऱ्या यात्रेकरूंची यादी आयटीबीपीकडे दोन दिवस आधी येते. यात्रेकरूंना सुरक्षा पुरविणे व त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले जात असल्याचे संजय खाली यांनी सांगितले.