आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pilibhit Maneka Cites Sonia’S Example To Check Corruption

मनेकांनी केले जाऊबाई सोनियांच्या कौतूक, अधिकाऱ्यांना सांगितली कामाची पद्धत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधा यांनी मोठ्या जाऊबाई सोनिया गांधींची स्तुती केली आहे. एका कार्यक्रमात मनेकांनी त्यांच्या मतदारसंघातील अधिकाऱ्यांना सोनिया गांधींचा दाखला देत भ्रष्टाचार कसा रोखता येईल हे सांगितले.

काय म्हणाल्या मनेका
- पीलीभीत हा मनेका गांधी यांचा मतदारसंघ आहे. तेथील जिल्हा नियोजन बैठकीत शनिवारी त्या भाषण करत होत्या.
- यावेळी अधिकारी म्हणाले की त्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार नाहीत.
- अधिकाऱ्यांच्या या वक्तव्यावर मनेकांनी, सोनिया गांधींनी उचललेल्या एका पावलाची आठवण करुन दिली. त्या म्हणाल्या, सोनियांनी त्यांच्या नावाचा गैरवापर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर तो तत्काळ थांबवला होता.
- मनेका म्हणाल्या, 'सोनिया गांधींच्या एका नातेवाईकाने एक दुकान सुरु केले होते आणि आपण सोनिया गांधींचे नातेवाईक आहोत असे बजावून आपल्याच दुकानातून माल खरेदी करण्याची सत्ती केली होती.'
- सोनिया गांधींना हे कळाल्यावर त्यांनी काय केले, मनेकांनी यावेळी सांगितले. त्या म्हणाल्या, 'सोनियांनी तत्काळ वृत्तपत्रात जाहिरात देऊन आवाहन केले की त्या व्यक्तीच्या दुकानातून जाऊ नये.'
पुढील स्लाइडमध्ये,
>> मनेकांनी का दिला सोनियांचा दाखला