आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाखुश वैमानिकाने मारला इंजिनिअरला जोरदार ठोसा, एअर इंडियाच्या विमानात थरार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - एअर इंडिया पुन्हा चर्चेत आली आहे. या वेळी कारण ठरले वैमानिक-इंजिनिअरचे भांडण. चेन्नईहून दिल्लीमार्गे पॅरिसला जाणा-या फ्लाइटवरून वैमानिक मणिकलाल आणि ग्राउंड इंजिनिअर कन्नन यांच्यात वाद झाला. माणिकलालने कन्नन यांना एवढे मारले की त्यांच्या नाकातून रक्त वाहायला लागले. जखमेवर मलमपट्टी करण्यासाठी रुग्णालयात न्यावे लागले. उड्डाण घेण्यापूर्वी ही घटना घडली. त्या वेळी विमानात १२२ प्रवासी बसले होते. वादामुळे सकाळी ९.४५ ची फ्लाइट ११.३७ ला रवाना झाली. वैमानिकाला ड्यूटीवरून हटवण्यात आले.

वैमानिक म्हणाला, विमान नादुरुस्त
*मुंबईहून चेन्नईला पोहोचल्यावर वैमानिक मणिकलालने इंजिनिअर्सना विमानात काही गडबड असल्याची तक्रार करत दुरुस्ती करण्यास सांगितले.
*इंजिनिअर्सनी काम सुरू केले. थोड्या वेळानंतर इंजिनिअर व्ही. टी. कन्नन म्हणाले, सर्व काही ठीक आहे. तुम्ही उड्डाण घेऊ शकता.
*मणिकलाल समाधानी नव्हते. त्यांनी नकार दिला आणि गडबड लवकर दुरुस्त करण्याचा सल्ला दिला. त्यावरूनच वाद पेटला.वाद एवढा भडकला की वैमानिकाने इंजिनिअरच्या चेह-यावर ठोसा लगावला. त्यामुळे इतर इंजिनिअर आणि ग्राउंड स्टाफ संतप्त झाला.

अखेर उडाले विमान
मणिकलाल यांनी स्वत:ला कॉकपिटमध्ये बंद करून घेतले. ग्राउंड स्टाफने कठोर भूमिका घेतली. अखेर वैमानिक बाहेर आला. एअर इंडियाने कृष्णकुमार यांच्याकडे विमानाची सूत्रे सोपवली. त्यांनी आहे त्या स्थितीत उड्डाण घेतले.