आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिनाका मार्क टूची चाचणी यशस्वी, ४४ सेकंदात १२ रॉकेट्स दागण्याची क्षमता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पिनाका मार्क टू मल्टी बॅरल रॉकेट लॉंचर सिस्टमची आज (रविवार) राजस्थानमधील पोखरणच्या चंदन परिसरात यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) आणि भारतीय लष्कराच्या निगराणीखाली शुक्रवारपासून चाचणीसाठी प्रयत्न करण्यात येत होते.

डीआरडीओचे प्रवक्ते रवी गुप्ता यांनी सांगितले, की पिनाका मार्क टू ची चाचणी घेताना फायरिंग पॉईंटपासून ३० किलोमीटर दूर असलेल्या लक्ष्याला यशस्वीपणे भेदण्यात आले. डीआरडीओ आणि भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी चाचणीवर समाधान व्यक्त केले आहे.

शत्रूपक्षाच्या लष्कराची दिशाभूल करणे, कम्युनिकेशन सेंटर, तोफा आणि रॉकेटस् च्या ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी पिनाका मार्क टू विकसित करण्यात आले आहे.