आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिनाका अग्निबाणाची यशस्वी चाचणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालासोर - 40 कि.मी. अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या देशी बनावटीच्या पिनाका अग्निबाणाची तिसर्‍यांदा यशस्वी चाचणी करण्यात आली. पिनाका अग्निबाणाची 1995 पासून चाचणी घेण्यात येते. अग्निबाण लष्करामध्ये दाखल करण्यात आले आहे, मात्र शस्त्रास्त्रातील आधुनिक प्रणालीबाबत नवी चाचणी घेण्यात आल्याचे संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले.
चंदिपूर चाचणी क्षेत्रात पिनाका रॉकेटच्या तीन राउंडची चाचणी घेण्यात आली. सहा प्रक्षेपकांच्या साहाय्याने 12 अग्निबाण एकाचवेळी 44 सेकंदामध्ये लक्ष्य भेदू शकतात. तोफ गोळ्यांना पूरक शस्त्र म्हणून अग्निबाणाचा वापर केला जात आहे. रॉकेटमध्ये जड वस्तू आणि बंकर्स नष्ट करू शकतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पिनाका मार्क 2 रॉकेटची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. रॉकेटच्या अत्याधुनिक यंत्रणेचा विकास व चाचण्या सुरूच राहतील, असे सूत्रांनी सांगितले.