आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pink Auto Will Starts From 26 January In Gorakhpur

PINK AUTO: ही 12 वी पास महिला बनेल UPची पहिली ऑटो ड्रायव्हर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर- शहरातील जनतेसाठी गुड न्यूज आहे. ती म्हणजे, 'पिंक ऑटो' उपक्रम लखनौमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता गोरखपूरमध्ये राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे पिंक ऑटोवर महिला ड्रायव्हर असणार आहे. 12वी उत्तीर्ण संगीता चौधरी यांना यूपीची पहिली महिला ऑटो ड्रायव्हर बनण्याचा बहुमान मिळाला आहे. संगीता चौधरी सध्या इतर महिलांना ऑटो चालवण्याचे ट्रेनिंग देत आहे.

पुढे वाचा, काय आहे 'पिंक ऑटो'चे वैशिष्ट्‍ये...
- ऑटो केवळ महिला महिला चालवणार
- महिला ऑटो केवळ 25 हजारांत खरेदी करू शकतात.
- महिलांसाठी दोन- तीन हजारांपेक्षा कमी मासिक हप्ता
- महिलांना रोजगाराची संधी मिळणार
- 'पिंक ऑटो'च्या माध्यमातून महिलामध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

काय असेल शहरात ऑटो चालवण्याची वेळ...
- महिलांना सिटी एरियात 16 किलोमीटर रेडियसमध्ये चालवतील.
- पहाटे 5 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत महिलांना ऑटो चालवण्याची परवानगी‍ आहे.
- आपातकालीन स्थितीत सायंकाळी 7 वाजेनंतरही महिला ऑटो चालवू शकतील.
- मात्र या काळात त्यांचे पती त्यांच्यासोबत असतील.
- महिलांची प्रकृती ठिक नसेल तेव्हा त्यांचे पती ऑटो चालवू शकतात.

संगीता देत आहे इतर महिलांना ट्रेनिंग...
- संगीता चौधरी इतर महिलांना ऑटो चालवण्याचे ट्रेनिंग देत आहे.
- पिंक ऑटो उपक्रम केवळ महिलांसाठी आहे.
- पुरुष प्रवाशांना ऑटोत बसता येणार नाही.
- या उपक्रमामुळे महिलांची छेडछाडीवर अंकुश ठेवता येईल.

26 जानेवारीपासून शहरात धावणार पिंक ऑटो
- प्रजासत्ताक दिनापासून (26 जानेवारी) शहरात 40 पिंक ऑटो धावणार आहे. 0
- सर्वहारा महिला मंचच्या कार्यक्रम संरक्षक संगीता चौधरी ही पहिली महिला ऑटो ड्रायव्हर ठरणार आहे.
- महिलांना सुरक्षितेसोबत रोजगाराची सं धी मिळणार आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 16 महिला घेत आहेत ट्रेनिंग...