आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान माेदींनी सीटबेल्ट घातलेला फाेटाे व्हायरल! उमर अब्दुल्लांचे ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरत दौऱ्यावर होते. विमानतळावरून निघाल्यावर त्यांनी कारमध्ये सीटबेल्ट बांधला. मोदी यांचे सीटबेल्ट लावलेले छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी त्यांची स्तुती केली. तसेच लोकांनी त्यांचे अनुकरण करण्याचे आवाहनही त्यांनी ट्विटरवर केले.  अब्दुल्लांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र शेअर केले. ते म्हणाले की, जे लोक कारच्या समोरील सीटवर बसतात, ते सीटबेल्ट बांधत नाहीत. स्वत:ला ‘कूल’ समजतात, त्यांनी पंतप्रधानांकडून शिकले पाहिजे. आपले पंतप्रधान सीटबेल्ट लावतात, ते वाहतूक पोलिसांना घाबरल्यामुळे नव्हे.  यासोबतच उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान सुरतला पोहोचल्याचे ट्विट केले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, उमर अब्दुल्लांचे ट्विट...

बातम्या आणखी आहेत...