आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Plastic Surgery Sucsess On Bollywood Actress Hema Malini, Car Accident

हेमा मालिनींवर प्लास्टिक सर्जरी, नऊ महिन्यांत गायब होतील जखमांचे व्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेमा मालिनींचा प्लास्टिक सर्जरीनंतरचे छायाचित्र - Divya Marathi
हेमा मालिनींचा प्लास्टिक सर्जरीनंतरचे छायाचित्र
जयपूर- बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी यांच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्‍यात आली आहे. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हेमा यांच्यावर उपचार सुरु आहेत. फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ. पी. तंबोली यांनी सांगितले की, हेमा मालिनी उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत.

हेमा यांच्या नाकाला फ्रेक्चर झाले आहे. त्या शुध्दीवर असून धोका टळला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हेमा यांच्या चेहर्‍याच्या काही भागावर, भुवयांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आली आहे. प्लास्टिक सर्जन संदीप मुकुल यांनी सांगितले की, हेमा यांच्या चेहर्‍यावरील जखमांचे व्रण नाहिसे होण्यासाठी किमान नऊ महिने लागतील. हेमा सध्या लिक्विड डाइटवर आहेत. त्यांनी सकाळी नास्ताही केला.

दरम्यान राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये जाऊन हेमा मालिनी यांची चौकशी केली. त्यासोबतच अल्टोमधील जखमी कुटुंबाचही त्यांनी भेट घेतली.
भाजप प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी यांनी देखील हेमा यांची भेट घेऊन चौकशी केली.

आग्रा मार्गावर हेमा यांची मर्सिडीज आणि अल्टो कारची टक्कर झाली होती. कारमधील एका चिमुरडीचा अपघातात मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी हेमा मालिनी यांच्या कार ड्रायव्हरला ओव्हर स्पीड ड्रायव्हींग केल्याबद्दल अटक करण्यात आली.
ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
हेमा मालिनी अपघातानंतर घटनास्थळावरुन दुसऱ्या कारने जयपूरला निघून गेल्या. त्यांनी अल्टो कारमधील जखमींची विचारपूस केली नसल्याचा आरोप होत आहे. ड्रायव्हर महेश ठाकूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ईशा देओल पोहचली
हेमा मालिनी यांना उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोके, हात, आणि कमरेला मार लागला आहे. अपघात निधन झालेल्या चिमुरडीला वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचे प्राण वाचले असते असे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनेशी संबंधित छायाचित्रे...