आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंडित जवाहललाल नेहरुंनी फुलांचा हार हाती दिला अन् तिच्या आयुष्यात जणू वादळच आले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धनबाद- ही आहे एका 76 वर्षीय महिलेची कहाणी. पंडित नेहरू यांची पत्नी असल्याच्या आरोपावरून समाजाने, गावाने बहिष्कृत केल्यानंतर 58 वर्षांपासून ती ही शिक्षा भोगते आहे. तिला पाहून लोक तिची टर उडवत. वर्षानुवर्षे अपमान सहन करणारी ही महिला आता एकटी राहते. प्रथमच तिने ही आपबीती सांगितली...

डिसेंबर 1959 ची ही गोष्ट. पंडित नेहरू धरणाचे उद्घाटन करण्यासाठी पश्चिम बंगालमधील एका गावात आले होते. नेहरूंच्या आग्रहावरून या धरणाचे उद्घाटन 17 वर्षीय बुधनीच्या हस्ते झाले. एखाद्या प्रकल्पाचे मजुराच्या हस्ते उद्घाटन होण्याची देशातील ही पहिलीच वेळ होती. तो बहुमान बुधनीला मिळाला. मात्र, हा क्षण बुधनीच्या जीवनात जणू वादळ घेऊन आला. या कार्यक्रमात नेहरूंनी बुधनीच्या हाती फुलांचा एक हार दिला होता. म्हणून आदिवासी परंपरेनुसार बुधनी नेहरूंची पत्नी ठरली. नेहरू तर आदिवासी नव्हते. बिगर आदिवासीशी लग्न केले म्हणून संथाली समाजाने तिला जात आणि गावातून बहिष्कृत केले. तेव्हा बुधनी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनमध्ये मजूर म्हणून काम करत होती. काही दिवस तिने मजुरी केली. मात्र, 1962 मध्ये तिला काढून टाकण्यात आले. तिने बंगाल सोडून बिहारमध्ये (आता झारखंड) आश्रय घेतला. सात वर्षे ती भटकंती करत राहिली. एक दिवस तिची एका प्रकल्पाचे अधिकारी सुधीर दत्ता यांची भेट झाली. त्यांनी बुधनीला दत्ता हे नाव दिले. मात्र, समाजाच्या भीतीने तिने अधिकृत विवाह केला नाही. आता ती तीन मुलांची आई आहे.

1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना बुधनी-नेहरू यांचा हा किस्सा कळला. राजीव गांधी यांच्या निरोपानुसार बुधनी त्यांना भेटण्यासाठी ओडिशात गेली होती. आता खूप काळ लोटला आहे. बुधनी निवृत्तीचे जीवन जगत आहे. तिने सांगितले, काही वर्षांपूर्वी कित्येक वर्षांनी गावात गेले. कुटुंबीयांना भेटले आणि परतले. आता एखाद्या सण-उत्सवाच्या निमित्ताने ती गावात जाते. परंतु फक्त कुटुंबातील सदस्यच तिच्याशी बोलतात. समाजाने अजूनही तिला स्वीकारलेले नाही.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, संबंधित फोटोज....
 
बातम्या आणखी आहेत...