आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Began Near Gandhi Maidan In The Posters Have Been Torn. Even Yesterday\'s Rally.

बिहारमध्ये नरेंद्र मोदींचे पोस्टर्स फाडले; जेडीयूच्याही जाहिरातींना काळे फासले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान मोदीं याचे फाडलेले पोस्टर्स. - Divya Marathi
पंतप्रधान मोदीं याचे फाडलेले पोस्टर्स.


पटणा - बिहार येथे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. दरम्यान, रविवारी गया येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आधी काही कार्यकर्त्यांनी भाजपचे पोस्टर्स फाडले आहेत. विशेष म्हणजे यातील काही पोस्टर्सपैकी नेमका मोदी यांचा चेहराच फाडण्यात आला आहे तर दुसरीकडे भिंतीवर असलेल्या जेडीयूच्या जाहिरातींवर काहींनी काळे फासले आहे. परिणामी, सध्या पोस्टर्स वार रंगात आले आहे.
गया येथील गांधी मैदानावर रविवारी पंतप्रधानाची प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. पण, या सभेपूर्वीच त्यासाठी लावलेले पोस्टर्स विरोधकांनी फाडले आहेत. त्यामुळे दुसऱ्या गटातून जेडीयूच्या जाहिरातीवर काळे फासले गेले. शिवाय मोदी यांच्या पोस्टर्सच्या वर नीतीशकुमार यांचे पोस्टर्स लावण्यात आलेत.
बीजेपी भडकली म्हटले, आम्ही स्वत: लढू
बीजेपी खासदार गिरिराज सिंह म्हणाले, "" जेडीयूचे कायकर्ते गुण्डागर्दीवर उतरले आहेत. पंतप्रधानाचे पोस्टर्स फाडले जात आहेत. मात्र, प्रशासक केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. ज्या मैदानावर पंतप्राधानाची रॅली िनघणार आहे त्या ठिकाणी जेडीयूचे पोस्टर्स लावण्याची गरजच काय होती, नीतीशकुमार मुख्यमंत्रीपदाच्या आडून राजकारण करत आहेत. असे असताना प्रशासक त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असतील तर आम्ही स्वत: काय करायचे ते करू'' असा इशाराही त्यांनी दिला.
नक्षवा‌द्यांनी दिली धमकी
दुसरीकडे ९ ऑगस्ट हा दिवस काळा दिवस म्हणून पाळा, असे आवाहन नक्षवाद्यांनी केले आहे. दरम्यान, प्रचारासाठी जो कुणी आपले वाहन देईल, त्या वाहन चालकांना आणि मालकांना बघून घेतले जाईल, असा इशाराही नक्षवाद्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात हाय अर्लट देण्यात आला.