आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमनेसामने आल्यावर मोदी अन् राहुल गांधींचे असे होते भाव, ट्विटरवर येताहेत मजेदार कॉमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी सरदार पटेल जयंती कार्यक्रमात आमने-सामने आले होते. तब्बल 3 महिन्यांनी झालेल्या भेटीत दोघांचे एकमेकांकडे पाहतानाचे भाव चर्चेचा विषय ठरले आहेत. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला. ट्विटर युजर्सनी या फोटोला मजेदार कॅप्शनसह शेअर केले.
 
Funny ट्विट...
- @Atheist_Krishna ने लिहिले आहे - चलाओ ना नैनों से बाण रे, जान ले लो न जान रे...।
- @why_100_serious ट्विटर हैंडलने लिहिले आहे की मोदींशी वार्तालाप करण्यासाठी आपल्या खिशातून स्पीच काढताना गांधी.
- @coolfunnytshirt यांचे ट्विट आहे- आज तो आप को मेरे सवाल का जवाब देना ही पड़ेगा! रुको...अभी जवाब निकालता हूं पॉकेट से...
 
अगोदर झाले होते बोलणे
- याआधी 25 जुलैपासून संसदेत मोदींनी राहुल यांच्याशी हात मिळवून विचारले होते, "कसे आहात राहुलजी!" तेव्हा राहुल यांनी दोन्ही पुढे करून म्हटले होते, "सर, ठीक आहे!"
- मंगळवारी भलेही राहुल यांनी मोदींशी कोणतेही बोलणे केले नसेल, परंतु या कार्यक्रमात भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींशी त्यांनी हसून चर्चा केली.
- तथापि, राहुल गांधी बुधवारपासून पुन्हा 3 दिवस गुजरातेत निवडणूक प्रचार दौऱ्यावर जात आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ट्विटरवर येत असलेल्या प्रतिक्रिया...
बातम्या आणखी आहेत...