आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमेचे रक्षण करणारे जवान हेच माझे कुटुंबीय : पंतप्रधान मोदी; जवानांना दिली मिठाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जनतेला दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पंतप्रधान मोदी दिवाळी साजरी करण्यासाठी थेट जम्मू-काश्मीरच्या गुरेज सेक्टरवर ताबा रेषेनजीक पोहोचले. त्यांनी तेथे तैनात असलेल्या जवानांसोबत दोन तास घालवले आणि दिवाळी साजरी केली. जवानांना मिठाई देऊन मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी बोलताना मोदी म्हणाले, ‘मी पण कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करू इच्छितो आणि तुम्हीच माझे कुटुंबीय आहात.’
 

नवोन्मेषासाठी प्रोत्साहन
जवानांनी नवोन्मेषासाठी प्रयत्नरत राहावे असे अावाहन करून या माध्यमातून त्यांचे नियमित कार्य आणि रोजची तैनाती अधिक सुरक्षित होऊ शकेल, असे मोदी म्हणाले. लष्कर दिवस, नौदल दिन आणि हवाईदल दिनी आज अनेक नवोन्मेष पाहावयास मिळतात. अशांना पुरस्कारही दिले जातात. हे प्रोत्साहन असेच सुरू राहील, अशी हमी मोदींनी दिली. लष्करातील कर्मचाऱ्यांचे कल्याण व त्यांना सुविधा देण्याच्या दृष्टीने सरकार कटिबद्ध असल्याचे मोदी म्हणाले.
 
संरक्षणमंत्री अंदमानात
संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण दोन दिवसांच्या अंदमान दौऱ्यावर असून तेथे तैनात तिन्ही दलाच्या जवानांसोबत व त्यांच्या कुटुंबीयांसोबत त्या दिवाळी साजरी करणार आहेत.
 
जवानांसाेबत राहिले की शक्ती प्राप्त होते
जवानांसोबत राहिले की नवी ऊर्जा प्राप्त होते. जवानांनी दिलेले बलिदान आणि त्यांचे धारिष्ट याबाबत कौतुक करून अनेक जवान नियमित योगसाधना करत असल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे मोदी म्हणाले. योगामुळे जवानांची क्षमता वाढेल आणि मानसिक शांतीही लाभेल, असे ते म्हणाले.
 
 हे समर्पणाचे प्रतीक
घर, आप्तेष्ट आणि इतर कुटुंबीयांपासून दूर राहून सीमेवर अहोरात्र मातृभूमीचे रक्षण करणे, बलिदानाच्या सर्वोच्च परंपरेचे पालन करणे हे समर्पणाचे प्रतीक आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, ताबा रेषेवर बोलताना
 
यापूर्वी सियाचीनमध्ये दिवाळी
 यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सियाचीनमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. नंतर २०१५ मध्ये डोगराई वॉर मेमोरियलवर तर मागच्या वर्षी हिमाचल प्रदेशात आयटीबीपीच्या जवानांसोबत माेदींनी दिवाळी साजरी केली होती.

पुढील स्लाइडवर वाचा... काय आहे. #Sandesh2Soldiers कॅम्पेन?
बातम्या आणखी आहेत...