आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Declared Special Package For Bihar In Aara

\'जेपीं\'च्‍या मृत्‍यूला काँग्रेसच जबाबदार - पंतप्रधान नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहरसा (बिहार) - ''जयप्रकाश नारायण यांच्‍या मृत्‍यूला कॉंग्रेसच जबाबदार आहे. कॉंग्रेसने त्‍यांचा आयुष्‍यभर छळ केला. आज त्‍याच कॉंग्रेससोबत बिहारमधील काही स्‍थानिक पक्ष राजकारण करत आहेत. त्‍यामुळे या पक्षांना राजकारणातून उपटून फेकून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथील पटेल मैदानवर बीजेपीच्‍या'परिवर्तन रॅली' मध्‍ये ते नागरिकांना संबोधित करत आहेत. त्‍यांनी मैथिली भाषेत भाषणाला सुरुवात केली. यापूर्वी त्‍यांनी आराममध्‍ये आजच (मंगळवार) झालेल्‍या सभेत अनेक प्रोजेक्‍ट्स सुरू करणार आणि बिहारसाठी सवा लाख कोटी रुपये के पॅकेज देण्‍याची घोषणा केली.
ते पुढे म्‍हणाले, ''बिहारमध्‍ये जानेवारी 2015 पर्यंत 13 हजार 808 गुन्‍हे गंभीर घडले होते. अवघ्‍या सहा महिन्‍यांत त्‍यात झपाट्याने वाढ झाली आहे. आता तोच आकडा 18 हजार 500 एवढा मोठा झाला आहे, हा येथील जंगलराजचाच परिणाम आहे'', असे ते म्‍हणाले.
''18 ऑगस्‍ट 2008 मध्‍ये कोसीमध्‍ये अतिवृष्‍टी झाली होती. त्‍यामुळे महापूर आला होता. पुरामुळे 7 ते 8 जिल्‍हे प्रभावित झाले होते. त्‍यावेळी मी गुजरातचा मुख्‍यमंत्री होतो. आम्‍ही बिहारला पाच कोटी रुपयांची मदत देऊ केली. पण, नितीशकुमार यांचा हंहकार आड आला आणि त्‍यांनी चेक परत केला'', अशी माहितीही मोदी यांनी आपल्‍या भाषणादरम्‍यान दिली.
UPDATES...
2.09PM: स्‍पीच समाप्‍त.
-------------
2.12PM: स्पीचला सुरुवात. त्‍यांनी मैथिली भाषेत लोकांना संबोधित केले.
-------------
2.09PM: सहरसाच्‍या पटेल मैदानात बीजेपीच्‍या परिवर्तन रॅलीमध्‍ये पीएम नरेंद्र मोदी यांचे स्पीच सुरू.
पुढील स्लाइड्वर वाचा, आरा येथील सभेची बातमी...