आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या मदतीनंतर 12 वर्षांच्या मुलावर निःशुल्क उपचार, वडीलांनी मागितली होती मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारानंतर 12 वर्षांचा मुलगा पार्थ याच्यावर एम्समध्ये निःशुल्क उपचार करण्यात येत आहेत. त्याला मेंदुचा आजार आहे. त्याच्या उपचारावर वडीलांनी संपूर्ण पैसे खर्च केले होते. पत्नीचे दागिने विकले होते. पण तो काही बरा झाला नाही. त्यानंतर हतबल झालेल्या वडीलांनी पार्थला मदत करण्याची पंतप्रधानांकडे मागणी केली होती. तसे पत्र त्यांनी लिहिले होते. त्यानंतर मोदींनी पत्राला उत्तर दिले होते. आता पार्थवर निःशुल्क उपचार करण्यात येत आहेत.
 
चार महिन्यांपूर्वी समजला आजार
- पार्थ गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याला मेंदुचा आजार असून त्याचे नाव सबेक्यूट स्क्लेरोजिंग पेनेन्सेफ्लाइटिस (एसएसपीई) असे आहे.
- वडीलांनी सांगितले, की मला चार महिन्यांपूर्वी आजाराची माहिती मिळाली. अमरेली आणि अहमदाबादच्या सर्व स्पेशालिस्टकडून मी उपचार करुन घेतले. पण काही फायदा झाला नाही.
- माझ्या एकुलत्या एक मुलाच्या उपचारासाठी संपूर्ण संपत्ती विकली, पत्नीचे दागिने विकले.
- त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि आरोग्य मंत्र्याला पत्र लिहिले होते.
- काही दिवसांनी पीएमओमधून मला एक पत्र मिळाले. त्यात लिहिले होते, की पार्थवर एम्समध्ये निःशुल्क उपचार केले जातील.
 
एम्सचे स्पेशालिस्ट म्हणाले
- आम्हाला मोदींनी केवळ आर्थिक मदत दिली नाही तर पार्थ ठिक होईल असा विश्वासही दिला आहे.
- एम्सचे स्पेशालिस्ट म्हणाले, की मोदींच्या लेटरनुसार आम्ही पार्थवर उपचार करत आहोत. पण त्याची प्रकृती खुपच नाजूक आहे. त्याचे वाचण्याची शक्यता कमी आहे.
- हा जिवघेणा आजार आहे. शरीराचा एकेक अंग यामुळे काम करणे बंद करतो. आम्ही त्याच्यावर उपचार करत आहोत.
 
आधीही मोदींनी केली आहे मदत
- यापूर्वी उत्तर प्रदेशच्या एक 11 वर्षीय मुलाने मोदींना पत्र लिहिले होते. शाळेत जाताना मध्ये रेल्वे लाईन लागायची. यासंदर्भात मुलाने पंतप्रधानांकडे तक्रार मांडली होती.
- त्यानंतर मोदींनी रेल्वे विभागाला रेल्वे क्रासिंग सुरु करण्यास सांगितले होते. आता येथे त्याचे काम सुरु आहे.
- त्यापूर्वी 8 वर्षांच्या तैयबा नावाच्या मुलीने मोदींना पत्र लिहून मदतीची मागणी केली होती. त्यानंतर तिच्यावर जीबी पंत हॉस्पिटलमध्ये निःशुल्क उपचार करण्यात आले होते.
 
पुढील स्लाईडवर बघा, लहान मुलांमध्ये असे मिसळतात पंतप्रधान मोदी.....
बातम्या आणखी आहेत...