आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन नव्या मित्रांपेक्षा एक जुना मित्र कधीही चांगला! मोदींकडून भारत-रशिया मैत्रीचे गोडवे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - एक जुना मित्र दोन नवीन मित्रांपेक्षा कधीही चांगलाच असतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत-रशिया मैत्रीचा उल्लेख शनिवारी येथे शिखर परिषदेत केला.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन व मोदी यांनी या शिखर परिषदेत संरक्षण क्षेत्रातील १६ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. मोदी म्हणाले, भारत-रशिया संबंधांना आज नवीन दिशा दिली आहे. हे नाते अधिक दृढ व्हावे म्हणून प्रयत्न केले आहेत. मोदींनी भाषणाची सुरुवात आणि शेवट रशियन भाषेत केला.
जागतिक अर्थव्यवस्था व बाजारपेठेतील चढ-उतारांना तोंड देण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्रित कार्य करण्याबाबत सहमती दर्शवली. भारत-रशिया दोघेही संयुक्त राष्ट्रसंघ, ब्रिक्स, पूर्व आशिया परिषद, जी-२०, शांघाय सहकार्य संघटना यांसारख्या संघटनांत काम करताना परस्परांना सहकार्य करतात. ही भूमिका म्हणजे जागतिक क्षेत्रातील भागीदारीच आहे, असेही मोदी म्हणाले. संबंधित. पान ९
बातम्या आणखी आहेत...