आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशी भेटवस्तू मिळवण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सुषमांपेक्षा मागे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान, परराष्ट्रमंत्री, उपराष्ट्रपती आणि इतर अधिकाऱ्यांना परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंची यादी जारी केली आहे. त्यात या वर्षी जानेवारी-मार्चदरम्यान मिळालेल्या भेटवस्तूंचा समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे परदेशातून भेटवस्तू मिळवण्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकले आहे.
एकाच दिवसात जास्त भेटवस्तू मिळवण्याचा विक्रम निर्मला सीतारामन यांच्या नावे कायम आहे. तीन महिन्यांत ११५ वस्तू मिळाल्या असून त्यांची किंमत १० लाख ७० हजारांपेक्षा जास्त आहे. ती गेल्या वर्षाच्या या कालावधीच्या तुलनेत तीन पट आहे.

मोदींना १५ हजारांचा ट्रे आणि १० हजारांचा कटोरा
पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक ट्रे भेट मिळाला असून त्याची किंमत १५ हजार रुपये आहे. निळ्या रंगाचा एका कटोरा मिळाला असून त्याची किंमत १० हजार रुपये आहे. अनेक पुस्तकेही मिळाली असून त्यात उर्दू कवितांचे एक पुस्तकही (इंग्रजी भाषांतरासह) आहे. मोदींना मिळालेली सर्वात महाग भेट म्हणजे १८ हजार रुपयांचे घड्याळ.
उपराष्ट्रपतींना मिळाली लेडीज पर्स
उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारींना ९ वेगवेगळ्या भेटी मिळाल्या आहेत. त्यात लेडीज पर्स, लेडीज ड्रेस मटेरियलही आहे. त्यांना बुटीक ड्रेसचे ६ रोल मिळाले आहेत. त्याशिवाय ४० हजार रुपयांचा मेटल बॉक्स आणि दोन हजारांचे कफलिंकही आहेत.
सर्वाधिक २९ भेटवस्तू सुषमांना
परदेशातून सर्वाधिक २९ भेटवस्तू परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मिळाल्या. त्यांची किंमत २.२३ लाख रुपये आहे. ती एकूण भेटवस्तूंच्या २१ टक्के आहे. सर्वाधिक महाग भेटवस्तू ४० हजारांचा सिल्व्हर युटिलिटी बॉक्स, तर सर्वात स्वस्त भेटवस्तू दोन हजारांची आहे.
भेटवस्तूंत हे आहेत सर्वात पुढे
सुषमा स्वराज-२९, नरेंद्र मोदी- २५, निर्मला सीतारामन -१७, एस. जयशंकर -१२
पुढील स्लाइडवर वाचा, कोणाला काय मिळाले...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...