आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi Second Day In Varanasi Will Clean Assi Ghat

वाराणसी : पंतप्रधानांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना दिले स्वच्छतेसाठी आमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी दौर्‍याच्या दुसर्‍या दिवशी (शनिवार) अस्सी घाटावर हातात झाडू आणि कुदळ घेऊन हजर झाले आहेत. येथे मोदींनी पूजा केली. त्यानंतर अस्सी घाटावर स्वच्छता अभियान सुरु केले. त्यांनी मजुरांसह कुदळ चालवून श्रमालाही महत्त्व असल्याचे आज वाराणसीत दाखवून दिले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी उपस्थित होते.स्वच्छता अभियान सुरुवात केल्यानंतर मोदींनी नऊ जणांना या अभियानासोबत जुडण्याचे आवाहन केले आहे. त्यात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, चित्रकुट विद्यापीठाचे कुलगुरु स्वामी राम भद्राचार्य, भोजपुरी गायक आणि भाजप खासदार मनोज तिवारी, साहित्यिक मनु शर्मा, क्रिकेटर मोहम्मद कैफ, सुरेश रैना, पद्मश्री देवी प्रसाद द्विवेदी, टीव्ही कलाकार राजू श्रीवास्तव, गायक कैलाश खेर यांना स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
घाटांच्या विकासासाठी पंतप्रधान आज काही घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधानांचा अस्सी घाटाचा दौरा नियोजीत कार्यक्रम नव्हता. पंतप्रधान मोदी शनिवारी अस्सी घाटावर जाणार असल्याची माहिती मिळताच पालिकेचे अधिकारी शुक्रवारीच घाटावर हजर झाले आणि स्वच्छतेला सुरुवात केली. देव दिवाळीमुळे घाटावर पणत्या आणि फुलांच्या हारांचे निर्माल्य जमा झालेले होते, ते तत्काळ दूर करण्यात आले.