आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाज जगभरात याेग जागर, मोदींसोबत चंदीगडमध्‍ये 30 हजार लोक करतील योगासने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दुसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मंगळवारी जगभरात योगाचा जागर होणार असून त्यानिमित्त देशभरात तब्बल १ लाख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी प्रादेशिक स्तरावर १० मेगा कार्यक्रम होतील.
आज सार्वजनिक सुटी नाही : मंगळवारी सरकारी कर्मचाऱ्यांना सुटी नसून योगा ऐच्छिक असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.
योगा करणाऱ्यांत ३०% वाढ : आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी योगाचा अवलंब करणाऱ्यांच्या संख्येत ३० % वाढ झाल्याचे असोचेमने म्हटले अाहे.
- योग दिनाचा मुख्य कार्यक्रम चंदिगडमध्ये होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रमुख उपस्थिती राहील.
- या कार्यक्रमात पीएम सहभागी होणार असल्‍याने दर तीन तासाने हवामानाचा अंदाज घेतला जात आहे.
- हवामान विभागाचे चंडीगड सेंटरचे संचालक सुरेंद्र पाल यांनी सांगितले की, पावसाची दाट शक्‍यता आहे; आता तसे दिसत नसले तरी, पाऊस येऊ शकतो.
- पाल यांनी सांगितले की, सध्‍या कुरुक्षेत्र आणि कर्नालजवळ वातावरण खराब आहे.
असा आहे मोदींचा कार्यक्रम..
- पीएम सोमवारी रात्री चंदीगड येथे पोहोचणार आहेत. ते राजभवनमध्‍ये थांबतील.
- मंगळवारी लोकांसोबत ते योगासने करतील. सकाळी 8.20 वाजता ते दिल्लीला परततील.
- त्‍यांच्‍या विमानाच्या ग्राउंड हँडलिंगचे पूर्ण काम एयर इंडिया करणार आहे.
- पीएमओकडून मोदी व त्‍यांच्‍या सोबत येणा-या 50 सदस्‍यांच्‍या दलासाठी ब्रेकफास्टचा मेनूही पाठवण्‍यात आला.
- पंतप्रधानांसाठी उपमा, इडली-सांभर, पोहे तयार करण्‍यात येणार आहेत.
फोटो: अश्विनी राणा
पुढील स्‍लाइड्वरील फोटोंमध्‍ये पाहा, येथे होईल कार्यक्रम..
बातम्या आणखी आहेत...