आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मघातकी हल्ल्याच्या शक्यतेमुळे रद्द झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : नरेंद्र मोदी

लखनऊ/वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 14 ऑक्टोबरचा नियोजित वाराणीस दौरा रद्द होण्यामागे आत्मघातकी हल्ल्याची शक्यता असल्याचे कारण सांगितले जात आहे. गुप्तचर संस्थांनी गृहमंत्रालयाला पाठवलेल्या एका रिपोर्टमध्ये पंतप्रधानांच्या दौ-या दरम्यान पती-पत्नीच्या रुपात दहशतवादी आत्मघातकी हल्ला करू शकतात अशी शक्यता व्यक्त केली होती. मात्र 'हुडहुड' वादळामुळे दौरा रद्द करण्यात आल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे. मोदींच्या वाराणसी दौ-यादरम्यान वादळामुळे सुरक्षाव्यवस्थेत अडचणी निर्माण होऊ शकतात, असे अधिका-यांनी सांगितले.
अधिका-याने दिली माहिती
गुप्तचर संस्थांनी केंद्रिय गृहमंत्रालयाला पाठवलेल्या रिपोर्टमध्ये मोदींच्या वाराणसी दौ-यादरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केली होती. गुप्तचर संस्थेच्या अधिका-याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, वाराणसीत मोदींवर हल्ला होण्याची शक्यता आहे. 21 मे 1991 ला श्रीपेरंबदूरमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रमाणे मोदींवर हल्ला होऊ शकतो अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. लिट्टेंच्या या हल्ल्यात राजीव गांधींची मृत्यू झाला होता. या माहितीनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या संस्थांना कळवण्यात आल्याचे या अधिका-याने सांगितले.

पुढे वाचा, कशी होती वाराणसीतील सुरक्षा व्यवस्था