आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी अचानक भारत-पाक सीमेवर; केली अतिरेक्यांच्या ठिकाणांची पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट- अतिरेकी हल्ल्यानंतर शनिवारी पठाणकोट हवाई तळाचा दौरा करण्यासाठी आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वनियोजित कार्यक्रम नसतानाही हवाई तळावरून थेट भारत-पाक सीमेची पाहणी करण्यासाठी बम्याल सेक्टरमध्ये गेले.सुमारे ४० मिनिटांच्या हवाई सर्वेक्षणानंतर मोदींनी दुर्बिणीने रावी आणि उज्ज दरियाची पाहणी केली. या भागातूनच अतिरेकी भारतात घुसले होते. मोदी साडेतीन तास पठाणकोटमध्ये होते. पंतप्रधानांच्या पठाणकोटसह या दौऱ्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली नव्हती.

मोदी शनिवारी सकाळी ११.१० वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह पठाणकोटला पोहोचले. त्यांच्या आधी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह आणि हवाई दल प्रमुख अरूप राहा तेथे आले होते. हवाई दल आणि एनएसजी यांनी पंतप्रधानांना त्यानंतर माहिती दिली. मोदींनी अतिरेक्यांशी जेथे चकमक झाली त्या स्थळाला भेट दिली. त्यांनी लष्करी तळांवरील सुरक्षा वाढवण्याचा आदेश दिला.

बीएसएफचा काॅन्स्टेबल हेरगिरीप्रकरणी अटकेत
पंजाब पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा बीएसएफचा काॅन्स्टेबल अनिलकुमार याला शनिवारी अटक केली. अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी यासाठी तो पाकिस्तानी तस्करांना मदत करत होता. त्याची चौकशी केली जात आहे.

हवाई तळाच्या कुंपणावरील तार कापलेली आढळली
एनआयएच्या तपासात पठाणकोट हवाई तळाच्या कुंपण भिंतींच्या आत फूट तार कापलेली आढळली. तळाच्या मागच्या बाजूने ताजपूर-अकालगढ गावाकडून नाल्याजवळी कुंपणाची भिंत अोलांडून अतिरेकी हवाई तळ परिसरात घुसले होते. अतिरेक्यांशी चकमकीनंतर सर्च ऑपरेशनदरम्यान एमईएस कँटीनजवळ तार कटर सापडले होते. त्यामुळे अतिरेक्यांनी भिंतीजवळील एका झाडाच्या आडून कुंपणाची तार कापली आणि आत घुसले, असे म्हटले जात आहे.

मोदींनी बैठकीत विचारले...
आता आंतरराष्ट्रीय सीमेचा दौरा करून अतिरेकी जेथून घुसखोरी करतात ते भाग पाहता येतील का?

अधिकारी म्हणाले...
सध्या फक्त हवाई दौरा करा. त्यानंतर दुपारी वाजता लष्कराच्या चार हेलिकॉप्टरने मोदी आणि अधिकाऱ्यांनी बम्यालच्या रावी आणि उज्ज दरियाजवळील भागाची पाहणी केली.

पुढील स्लाइडवर पाहा, लष्कराच्या सर्च ऑपरेशनची माहिती घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
बातम्या आणखी आहेत...