आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेते व्होटबँकेसाठी काम करतात आम्ही देशासाठी काम करतो, मोदींनी केले शौचालयाचे भूमिपूजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पशूधन मेळाव्याचे मोदींनी शनिवारी उद्घाटन केले. - Divya Marathi
पशूधन मेळाव्याचे मोदींनी शनिवारी उद्घाटन केले.
शहेनशाहपूर- वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी शहेनशाहपूर गावाचा दौरा केला. येथे आयोजित पशू आरोग्य मेळाव्याचे उद््घाटन केल्यानंतर त्यांनी मतांचे राजकारण करणाऱ्या विरोधकांवर हल्लाबोल केला. राजकारणात मतांचे गणित मांडून लोकांची कामे करण्याची प्रवृत्ती असते. बिचारे पशू मते देत नाहीत म्हणून दुसरे पक्ष त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. आमचे सरकार या पशूंची सेवा करत आहे, असे मोदी म्हणाले. भाजपसाठी पक्षापेक्षा देश महत्त्वाचा आहे. सरकारचे प्राधान्यक्रम मतांच्या हिशेबाने ठरवले जात नाहीत. देशाच्या विकासालाच प्राधान्य आहे, असेही मोदींनी म्हणाले.
 
कठीण काम मोदी नाही तर कोण करेल?
गरिबातल्या गरीब लोकांना घर देणे हे आमचे कर्तव्य आहे. हे काम अत्यंत कठीण अाहे. हे कठीण काम मोदी नाही तर कोण करेल? म्हणूनच २०२२पर्यंत देशातील प्रत्येक गरिबाला घर देण्याचे ठरवले आहे, असे मोदी यांनी सांगितले.
 
'तुमची तपस्या वाया जाणार नाही'
- नरेंद्र मोदी म्हणाले, 'सकाळी-सकाळी  एवढा जनसागर लोटला आहे. सर्वत्र लोकच लोक दिसत आहे. सभेसाठीची व्यवस्था अपुरी पडली त्याबद्दल मी क्षमा मागतो.' उन्हात उभे असलेल्या लोकांना मोदी म्हणाले, मी तुम्हाला विश्वास देतो की तुमची तपस्या वाया जाऊ देणार नाही. 
- मोदी म्हणाले, 'यूपीच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. आज त्यांनी पशूधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. मी जेव्हा आलो तेव्हा येथे 1700 जनावरे होती. त्यांच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक येथे आले आहे. शेतकरी पुरेसा पैसा नसल्यामुळे जनावरांची योग्य निगा राखू शकत नाही त्यांची या मेळाव्यामुळे सोय झाली आहे.'
 
स्वच्छतेबद्दल मोदी म्हणाले...
'अस्वच्छता कोणालाच आवडत नाही. घाणीत जाण्याची कोणाचीच इच्छा नसते. परंतू आम्ही घाण करतो आणि स्वच्छता कोणी दुसऱ्याने केली पाहिजे ही आमची मानसिकता आम्हाला बदलावी लागेल. यामुळेत आमची गावे आणि शहरं अजून स्वच्छ झालेली नाही. स्वच्छता ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे. फक्त गाव आणि गल्ली चांगली दिसावी यासाठी स्वच्छता नाही तर यामुळे आरोग्य चांगले राहाते.'
 
मी ज्या गावात गेलो तेथील शौचालयावर लिहिले होते - इज्जतघर 
- नरेंद्र मोदी म्हणाले, 'यूनिसेफने म्हटले की ज्या घरात शौचालय आहे आणि कुंटुंब जर त्याचा वापर करत असेल तर त्या कुटुंबाचा आरोग्यावर होणारा वार्षिक 50 हजार रुपये खर्च कमी होतो. मी येथे एका गावात गेलो, तेथील गावकऱ्यांनी सांगितले की 2 ऑक्टोबरनंतर गावातील एकही व्यक्ती उघड्यावर जाणार नाही.'
- आज मी ज्या गावात गेलो होतो तिथे शौचालयावर लिहिले होते, इज्जतघर. हे आमच्या महिलांच्या इज्जतीसाठी आहे. ज्या लोक आपल्या घरातील महिलांची इज्जत करतात ते नक्कीच शौचालयाचा वापर करतील. 
बातम्या आणखी आहेत...