आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामसोबत PM चे फोटो प्रसिद्ध करुन JDU ने विचारले- त्यांच्यासोबत काय करत होते मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमधील झप्पीबाबासोबत मुख्यमंत्री नितीशकुमारांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जनता दल संयुक्तने (जेडीयू) पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बाबा आणि बुवांसोबतचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. नितीशकुमारांचा तंत्र-मंत्रावर विश्वास असल्याचा आरोप भाजपने केला होता, त्याला प्रत्युत्तर देत जेडीयूने मोदींचे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे आरोप आसाराम यांच्यापासून शंकराचार्य, सत्य साईबाबा, श्रीश्री रवीशंकर, बाबा रामदेव आणि इतर काही बाबांसोबतचे फोटो प्रसिद्ध करत नरेंद्र मोदींचा तंत्र-मंत्रावर विश्वास असल्याचा प्रचार सुरु केला आहे.
जेडीयूने विचारले, आसारामसोबत काय करत होते मोदी?
जनता दल संयुक्तचे प्रवक्ते संजयसिंह यांनी फोटो प्रसिद्ध करत पंतप्रधान मोदींना प्रश्न उपस्थित केला आहे, की मोदी म्हणतात त्यांचा तंत्र-मंत्रावर विश्वास नाही मग बलात्काराचे आरोपी आसारामसोबत ते काय करत होते? त्यांना आसारामच्या आशीर्वादांची काय गरज पडली होती ? जेडीयू प्रवक्ते म्हणाले, नितीशकुमारांकडे बोट दाखविण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी एकदा स्वतःच्या भूतकाळातही डोकावले पाहिजे होते. आपण कोणकोणत्या बाबांकडे जाऊन आलो, याचा त्यांनी विचार करायला पाहिजे होता. त्यांनी दावा केला की पंतप्रधान मोदी आसाराम सह अनेक तांत्रिक-मांत्रिकाच्या पुढे डोके ठेवत आले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण-कोणत्या बाबांसोबत दिसले पंतप्रधान मोदी