आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड-हैदराबाद: विमानसेवा भाडे Rs.1100; पण अर्धे विमान रिकामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिमला- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वस्तातील विमानसेवा ‘उडान- उडे देश का आम नागरिक’ चा शुभारंभ केला. मोदींनी एअर इंडियाच्या सिमला-दिल्ली आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने ट्रुजेटच्या कडप्पा - हैदराबाद आणि नांदेड-हैदराबाद या सेवांनाही हिरवी झेंडी दाखवली. या योजनेनुसार २५०० रुपयांत एक तास व ५०० किमीच्या मार्गांवर विमान प्रवास करता येईल. विमानातील आधीच्या निम्म्या तिकिटांना ही सवलत मिळेल. उर्वरित तिकिटे नेहमीच्या दराने मिळतील.
 
नांदेडहून विमानाचे ‘उडान’
नांदेड - येथील गुरुगोविंद सिंगजी विमानतळावरून ट्रू जेट कंपनीच्या विमानाने गुरुवारी हैदराबादसाठी उड्डाण केले. ४५ मिनिटांच्या हवाई प्रवासासाठी १,१०० रुपये भाडे असूनही पहिल्या दिवशी केवळ ३९ प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. मध्यम आकाराच्या या विमानाची प्रवासी क्षमता ७२ आहे.
 
मुंबईसाठी ८ दिवस : अनेकांनी अॅडव्हान्स बुकिंग करूनही नांदेड- मुंबई विमानसेवा गुरुवारी सुरू झाली नाही. तांत्रिक अडचणींमुळे या सेवेला आठ दिवस लागतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. नांदेड विमानतळावर उद्घाटन कार्यक्रमात श्रेयासाठी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांत चांगलीच जुंपली.

राज्यात सप्टेंबरपासून ५ ठिकाणी विमानसेवा 
मुंबई- एक सप्टेंबरपासून राज्यातल्या अन्य पाच विमानतळांवरून विमानसेवा सुरू होऊ शकतात, असे राज्याचे हवाई संचालक कॅप्टन संजय कर्वे यांनी ‘दिव्य मराठी’कडे सांगितले. विमानसेवेसाठी धावपट्ट्या निवडण्याचा अधिकार कंपन्यांना देण्यात अाला हाेता. त्यानुसार नांदेड- हैदराबादचे कंत्राट ट्रूजेट, तर जळगाव, अाेझर, काेल्हापूर, साेलापूर, पुणे या शहरांमधील विमानसेवांचे जाळे एअर डेक्कन कंपनीला मिळाले अाहे. सेवेसाठी एम -२८ जातीचे १९ अासनी विमान वापरले जाईल. 
 
ही शहरे जाेडणार 
नांदेड-हैदराबाद, मुंबई-जळगाव. मुंबई-अाेझर, मुंबई-काेल्हापूर, मुंबई-साेलापूर, अाेझर-पुणे.
बातम्या आणखी आहेत...