आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi In Assam Today Election Rally Latest Updates

पंतप्रधानांनी घेतले कामाख्या देवीचे दर्शन; रिमोट कोणाच्याही हातात देऊ नका- मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी- चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मोदी यंदाही नवरात्रीचे नऊ दिवसांचे निरंकार व्रत करणार आहे. यादरम्यान मोदी केवळ पाणी सेवन करणार आहेत.

मोदींनी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर नौगावमधील रोहा येथील प्रचार सभेत संबोधित केले. मोदी म्हणाले, आज संपूर्ण जगात भारताचा जयजयकार होत आहे. हा जयजयकार केवळ मोदींमुळे नव्हे तर देशातील जनतेमुळे होत आहे. कोणाच्याही हातात रिमोट देऊ नका. भाजपला बहुमतांनी विजयी करा. बॅक सीट ड्रायव्हिंग करु नका, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले. मोदी दुपारी 1.45 वाजता रंगिया, 3.25 वाजता सारभोग व सायंकाळी 5.30 वाजता गुवाहाटीत संबोधित करणार आहे.

रोहामधील सभेत काय म्हणाले मोदी?
- मोदी म्हणाले, कॉंग्रेसने आसाममधील जनतेला 15 वर्षे धोका दिला आहे.
- आसामच्या मुख्यमंत्री गोगाई यांनी नातेवाईक सोडले तर कोणाचेही भले केले नसल्याची खरमरीत टीका मोदींनी केली.
- पहिल्या टप्यात मतदारांनी विक्रमी मतदान केले. मतदान शांततेत पार पडले. मुख्यमंत्र्यांचे हास्य बंद झाले आहे. जे दिल्ली वाचवू शकले नाही, ते मुख्यमंत्र्यांना काय वाचवतील, अशा शब्दात मोदींनी कॉंग्रेसचा समाचार घेतला.
- दुसर्‍या टप्प्यात देखील ऐतिहासिक मतदान होईल, भाजप बहुमताने आसाममध्ये सरकार स्थापन करेल, अशी अपेक्षा देखील मोदींनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, आसाममध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी शुक्रवारी आसाममध्ये चार शहरात प्रचार सभेत संबोधित करणार आहे. 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्‍यासाठी मोदी आसाममध्ये आले होते. मोदींनी यावेळी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. कामाख्‍या देवीचे मंदिर गुवाहाटीपासून 10 किलोमीटर अंतरावर नीलांचल डोंगरावर आहे.

मंदिराबाहेर 'हर-हर मोदी'च्या घोषणा...
- नरेंद्र मोदी यांनी 15 मिनिटे पूजा करून कामाख्या देवीचे दर्शन घेतले.
- योनिकुंडाची परिक्रमा करून दीपदान केल्याचे मंदिराच्या पुजार्‍याने सांगितले.
- भाजप कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात 'हर हर मोदी' व 'भाजप ज‍िंदाबाद'च्या घोषणा दिल्या.
- दुसरीकडे, राहुल गांधी देखील तीन सभांमध्ये संबोधित करणार आहे.
- आसाममध्ये 61 जागांसाठी 11 एप्रिलला मतदान होणार आहे.

मांत्रिकांचा गड मानले जाते कामाख्या मंदिर...
- देवीच्या 51 शक्तिपीठांमध्ये कामाख्या मंदिरला महत्त्व आहे.
- कामाख्या मंदिर मांत्रिक व अघोरींचा गड मानले जाते.
- मंदिरात त्रिपुरासुंदरी, मतांगी व कमला देवीच्या मूर्ती आहेत.
- मुख्य मंदिराजवळ कामाख्या देवीची दुसरी मूर्ती देखील आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, नरेंद्र मोदी यंदाही करणार आहे नवरात्रीचे निरंकार व्रत...