आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान मोदी म्हणाले - बालकांना रोज 15 चमचे दुध दिले तर ते निरोगी राहातील

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुसैनीवाला (पंजाब) - पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी शहीद दिवसा निमीत्त पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील हुसैनीवाला येथे पोहोचले, त्यांनी महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहिली. येथे आयोजित सभेत मोदी यांनी पंजाबच्या मातीला नमन करत या धरतीने देशासाठी मोठे योगदान दिल्याचे सांगितले. पाण्याच्या अतिवापरावर चिंता व्यक्त करताना मोदी म्हणाले, लहान बालकांना बदाम-पिस्ता घालून बादलीभर दुध पाजल्याने ते निरोगी राहातील का? नाही राहाणार. त्यासाठी बालकांना 15-20 चमचे दुध द्यावे लागेल. तसेच शेतीचे आहे. पीक चांगले येण्यासाठी त्यांना थेंब-थेंब पाणी दिले पाहिजे. निव्वळ पाण्याचे पाट शेतात सोडून दिले तर तो पाण्याचा दुरुपयोग आहे. त्याने पंजाबची पाणी पातळी खाली-खाली चालली आहे.
अमृतसरमध्ये भगतसिंगांच्या नावाने संस्था
पंतप्रधानांनी शहीद भगतसिंग यांच्या नावे अमृतसर येथे कृषी संशोधन संस्था आणि पदव्युत्तर महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा केली. त्यासोबतच केंद्र सरकारची स्वाइल हेल्थ कार्ड योजनेची माहिती दिली. ते म्हणाले, की यामुळे शेतकार्‍यांना कोणते पीक घेतले पाहिजे याची माहिती मिळेल आणि त्यांचे होणारे नुकसान टळेल. भारत सरकार शेतकर्‍यांच्यासोबत असल्याचे आश्वासत त्यांनी दिले.

पंतप्रधान म्हणाले, की शहीद भगतसिंग यांचे नाव उच्चारताच अबाल-वृध्दांना नवी उर्जा मिळते. आमच्या जगण्या -मरण्याची ते प्रेरणा आहे. देशातील सर्व नागरिकांच्या हाताला काम हीच देशासाठी बलिदान दिलेल्या या महापुरुषांना खरी श्रद्धांजली आहे. त्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम केले पाहिजे.

पंतप्रधान म्हणाले, मी गरीब कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे मला गरीबांचे शेतकर्‍यांचे दुःख कळते. पंजाबने देशाला अन्न देऊन देशवासियांचे भरणपोषण केले आहे. मात्र आज पाणी जमीनीत खोलखोल चालेले आहे. त्यासाठी अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाण्याचे दुर्भिष्य दुर करावे लागणार आहे.

हेलिकॉप्टरने हुसैनीवाला पोहोचले मोदी
पंतप्रधान मोदींनी शहीद भगतसिंग यांच्यासोबत शहीद राजगुरु, शहीद सुखदेव यांच्या समाधीवर पुष्पवाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदी हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथे पोहोचले.
फोटो - हुसैनीवाला येथील सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मोदींनी वाहिली शहीदांना श्रद्धांजली