आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयांपायी काय काय होते हे माहीत आहेच, वढेरांकडे अंगुलिनिर्देश करत काँग्रेसच्या वर्मावर बाेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मूत शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर निशाणा साधला. ते येथे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे सासरे आणि काँग्रेसचे दिवंगत नेते गिरधारीलाल डोगरा यांच्या जन्मशताब्दी समारंभात बोलत होते. मोदी म्हणाले, ‘डोगरा यांना माणसांची अचूक पारख होती. अरुण (जेटली) आणि त्यांच्या राजकीय विचारसरणीत काहीही समानता नव्हती. नाहीतर आजकाल जावयांमुळे काय-काय होते, हे तुम्हा-आम्हाला माहीत आहेच.’
हरियाणा, राजस्थानातील जमिनीच्या खरेदीवरून वढेरा वादात सापडले आहेत. ज्या नेत्याचा (डोगरा) उल्लेख करून मोदींनी वढेरांवर निशाणा साधला तेही जम्मू-काश्मीरमधील काँग्रेसचे दिग्गज नेते होते. डोगरा हे २७ वर्षे राज्याचे अर्थमंत्री, सहा वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार होते. त्यांनी विक्रमी २६ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांची मुलगी संगीता यांचा विवाह जेटली यांच्याशी १९८२ मध्ये झाला होता. त्यांच्या जन्मशताब्दी समारंभात जेटली यांच्या निमंत्रणावरूनच मोदी आले होते. त्यामुळे त्यांनी जावयाचा उल्लेख केला. हा कार्यक्रम जम्मू विद्यापीठाच्या जनरल जोरावर सिंह प्रेक्षागृहात झाला. त्या वेळी जेटली, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करण सिंह हेही उपस्थित होते. गिरधारीलाल डोगरा यांनीच गुलाम नबी यांना युवक काँग्रेसचा अध्यक्ष केले होते, याची आठवणही मोदींनी करून दिली.

राजकारणात पक्षीय अस्पृश्यता चालत नाही
राजकारणातअस्पश्यता चालत नाही असे सांगताना आपण या कार्यक्रमासाठी का आलो हे सांगताना मोदी म्हणाले, आज डोगराजी असते तर त्यांनीही आमचा विरोध केला असता. कदाचित आपल्या जावयाचाही (जेटली) त्यांनी विरोध केला असता. परंतु त्यांचे कार्य, त्यांच्या आयुष्याकडे आपण सर्वांनी गौरवानेच पाहिले पाहिजे. भाजपच्या काही नेत्यांनी एका काँग्रेसने नेत्याला (आझाद) या कार्यक्रमास बोलावण्याला आक्षेप घेतला होता.
बातम्या आणखी आहेत...