आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आम्ही युद्धाकडून बुद्धाच्या मार्गाने जाणारे लोक, लखनौ दसरा रॅलीत मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ - येथील ऐतिहासिक ऐशबाग रामलीलाच्या मंचावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधात कठोर संदेश दिला. दहशतवादाला थारा देणारांची गय केली जाणार नाही, असे सांगतानाच कधी कधी युद्धही अनिवार्य होऊन बसते, मात्र आम्ही युद्धाकडून बुद्धाच्या मार्गाने जाणारे लोक आहोत, असे मोदी म्हणाले.

मोदी म्हणाले की, भारत दहशतवादाचा मुद्दा मांडत होता, तेव्हा तो आंतरराष्ट्रीय समुदायाच्या पचनी पडत नव्हता. ९/११ च्या हल्ल्यानंतर त्यांना तो समजला. दहशतवाद हा मानवतेचा मोठा शत्रू आहे. दहशतवादाविरुद्ध पहिली लढाई जटायूने लढली होती. आपण राम बनू शकत नसलो तरी जटायूच्या रूपात भूमिका बजावू शकतो.
पुढील स्लाइडमध्ये, श्रीनगर दहशतवादाला मदत करणाऱ्यांना क्षमा नाही
बातम्या आणखी आहेत...