आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भविष्यात काँग्रेस शोधण्यासाठी पुरातत्व विभागाला काम करावे लागेल, काशीतील सभेत PM मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्या दिवशी आपल्या मतदारसंघात रोड शो केला. शनिवारीही मोदींनी येथे रोड शो केला होता. वास्तविक त्यांच्या रोड शोला प्रशासनाची परवानगी नव्हती. बंद गाडीत ते मंदिरात दर्शनासाठी जाण्याचे ठरले होते. मात्र अचानक रोड शो झाला. रविवारी सायंकाळी 5.30 वाजता वाराणसीत त्यांचा दुसरा रोड शो सुरु झाला.  काशी विद्यापीठात रात्री 9 पर्यंत मोदींचे भाषण झाले. सुमारे तासभराच्या भाषणात मोदींनी सपा, काँग्रेस आणि बसपावर हल्लाबोल केला. भविष्यात काँग्रेस नावाचा एखादा पक्ष होता, हे शोधण्यासाठी पुरातत्व विभाग स्थापन करावा लागेल असा टोला मोदींनी लगावला. देशातून काँग्रेस संपत चालली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. वाराणसीसह पूर्वांचलमध्ये 8 मार्चला विधानसभेसाठी मतदान होणार आहे.
 
काशी विद्यापीठात मोदींची जाहीर सभा
काशी विद्यापीठात मोदींची जाहीर सभा सुरु झाली आहे. मोदींनी वाराणसीचा कायकल्प बदलण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासोबतच सपा, बसपा आणि काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, पुर्वांचल आणि पुर्वोत्तर राज्य सोडल्यास प्रत्येक राज्यात काही तरी आर्थिक काम सुरु असते. यामुळे ते विकासाच्या दिशेने पुढे चालेल आहे. 

मला काशीच्या प्रेमातून सत्ता मिळाली...
अखिलेश यादव यांना सत्ता मिळाली ती त्यांच्या वडिलांकडून मिळाले आहे. राहुल गांधी यांचे नाव न घेता मोदी म्हणाले, अखिलेश यांचे जे नवे मित्र आहे त्यांना तर आई, वडिल, आजी, पंजोबा यांच्याकडून वारसा हक्काने सर्वकाही मिळाले आहे. मला जे काही मिळाले ते काशीवासियांच्या प्रेमातून मिळाले आहे. त्यामुळे मला निर्णय घेण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. 
 
आणखी काय म्हणाले नरेंद्र मोदी 

- समाजवादी पक्षाला वाराणसीतील विकास दिसत नाही. 
- आम्हाला रिंगरोड तयार करायचा होता, मात्र राज्य सरकारने नकार दिला. 
- इतरही कामांसाठी केंद्र सरकारने 11 हजार कोटी रुपये दिले. 
- मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्यांचा मावेजा दिला नाही. अजूनही साडेचार हजार कोटी रुपये पडून आहे. 
- वाराणसीचा आत्मा कायम ठेवून अत्याधुनिक सुविधा या शहराला देण्याचा माझा मानस आहे. मात्र उत्तर प्रदेशची अवस्था अशी आहे, 'यहा भी खुदा, वहा भी खुदा, जहा नही खुदा वहा कल खुदे गा.'
- राज्य सरकार एकही काम करत नाही. कारण त्यांना भीती वाटते की मोदीला क्रेडिट मिळाले तर?
- त्यांचे प्रत्येक काम हे मतपेटीवर आधारीत आहे. हे काम केले तर मतदान होईल की नाही यावरच काम करायचे की नाही हे अवलंबून आहे. 
- आमचा मंत्र सबका साथ सबका विकास आहे तर त्यांचे म्हणणे आहे की कुछ का साथ कुछ का विकास. 
- पूर्वांचलमध्ये सर्वकाही आहे. लोकांमध्ये कष्ट करण्याची ताकद आहे. निसर्गाची मोठी कृपादृष्टी आहे. येथे एकच कमी आहे. येथे फक्त योग्य सरकार नाही. 
 
- मोदींच्या रोड शोला सायंकाळी सुरुवात झाली होती.  कारच्या वरच्या बाजूला असलेली काच बाजूला करुन पंतप्रधान बाहेर आले. 
- कारवरुनच मोदी हात हलवून जनतेला अभिवादन करत आहेत. मोदींचा ताफा पांडेपूर चौकातून पुढे गेला आहे.
- जनतेमधून हर हर मोदीच्या घोषणा दिल्या जात आहे. 
- शिया पंथीयांनी चौकाघाट येथे मोदींचे स्वागत केले. 
 
13 वर्षानंतर प्रथमच देशाचे पंतप्रधान काशी विद्यापीठात 
- 13 वर्षांनंतर प्रथमच देशाचे एखादे पंतप्रधान काशी विद्यापीठात येत आहे. 
- अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांची काशी विद्यापीठात सभा झाली होती.
 
- भाजप मीडिया प्रमुख संजय भारद्वाज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींच्या रोड शोला दुपारी 3 वाजता पांडेपूर चौकातून सुरुवात होईल. चौकाघाड, तेलियाबाग, मलदहिया, पटेल चौक मार्गे सायंकाळी 5.30 वाजता महात्मा विद्यापीठात ते पोहोचतील. येथे विजयशंखनाद रॅलीला संबोधित करतील.
- सायंकळी 7.35 वाजता सभा संपल्यानंतर मोदी डीएलडब्ल्यू येथील प्रबुद्ध मिलन कार्यक्रमात सहभागी होतील. आज रात्रीचा मुक्काम त्यांचा वाराणसीतच असेल.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...