आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शास्त्रीजींच्या घराला भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान, मोदींनी भजनेही ऐकली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - ‘जय जवान जय किसान’ असा नारा देणारे  देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या स्मारकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भेट देऊन आदरांजली अर्पण केली. शास्त्रीजींच्या पिढीजात घराचे रूपांतर स्मारकात करण्यात आले असून त्याला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

गेल्या तीन दिवसांपासून मोदी आपल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहेत. मोदींनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी गंगेच्या किनारी असलेल्या शास्त्रीजींच्या घराला भेट दिली. शास्त्री चौकात तब्बल तीन तास मोदींचे समर्थक त्यांची प्रतीक्षा करत होते. मोदी पायी चालत स्मारकस्थळी गेले. तेथे त्यांनी शास्त्री आणि ‘भारत माते’च्या छायाचित्रांना पुष्पांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी शास्त्रीजींचे जीवनचरित्र दर्शवणाऱ्या छायाचित्रांची पाहणी केली. या वेळी शास्त्रींच्या जीवनावर आधारित एक गाणेही सादर करण्यात आले.
 
माझ्याकडे शब्दच नाहीत : सिंह
मोदींच्या या भेटीबद्दल वृत्तसंस्थेशी बोलताना शास्त्रीजींचे नातू आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव सिद्धार्थनाथ सिंह म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी आज जे केले ते मी शब्दांत व्यक्तच करू शकत नाही. माझे आजोबा काँग्रेसचे नेते होते, पण त्या पक्षाने त्यांना वाजवी सन्मान दिलेला नाही. या घराचे रूपांतर शास्त्रीजींच्या स्मारकात करावे म्हणजे लोकांना या स्थळाला भेट देता येईल आणि प्रेरणा घेता येईल, अशी विनंती माझ्या आजीने ४० वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारकडे केली होती. अखेर अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाल्यानंतरच त्याला मूर्त स्वरूप आले. आता मोदींनी त्यापुढील पाऊल टाकले आहे.’ या भावना व्यक्त करताना सिंह यांना भावना अनावर झाल्या होत्या.
 
देशवासीयांचे आदर्श
शास्त्रीजी हे प्रामाणिकपणा, निष्ठा याबद्दल देशवासीयांचे आदर्श आहेत. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांचे कणखर नेतृत्व आजही  स्मरणात आहे. शास्त्रीजींच्या पिढीजात घराला भेट देणारे मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत, अशी भावना या भागात राहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केली.
 
शास्त्रींच्या जीवनावरील भजनेही ऐकली 
- पीएम मोदी सकाळी 10.50 वाजता डीएलडब्ल्यू गेस्ट हाऊसवरून गढवा आश्रमात पोहोचले. याठिकाणी त्यांनी गुरू शरणानंद यांची दीक्षा घेतली. 
- शरणानंद म्हणाले, मोदींच्या नेतृत्त्वात भारताने जगाचे नेतृत्त्व करावे असे मला वाटते. 
- मोदींनी याठिकाणी भाषण केले नाही. आश्रमापासून ते रामनगर चौकाकडे रवाना झाले. 
- रामनगर चौकापासून सुमारे 800 मीटर पर्यंत मोदींनी रोड शो केला आणि शास्त्री चौकात गेले. 
- 12:30 वाजता पायी चालत मोदी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या घरी गेले. याठिकाणी लावलेले शास्त्रींचे फोटोही त्यांनी पाहिले. 
- याठिकाणी मोदींनी शास्त्रींच्या जीवनावर आधारित भजनही ऐकले. सुमारे 15 मिनिटे ते याठिकाणी थांबले. 
- मोदींनी 4 मार्चला बीएचयूपासून काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत 12 किमींचा रोड शो केला होता. 

गढवा आश्रम का निवडला..  
- गढवा आश्रमाचे 2 कोटी अनुयायी असल्याचे सांगितले जाते. त्यात यादवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. 
- तसेच दलित आणि इतर मागासवर्गीय देखिल अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. 
- तज्ज्ञांच्या मते मोदींना ही व्होट बँक हवी असल्याने ते या आश्रमात गेले. 
 
उत्तर प्रदेशात आज प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. आज सायंकाळी अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठीही निवडणूक प्रचार थांबणार आहे. या टप्प्यात पूर्वेकडील 40 जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळेच मोदी आणि त्यांना आघाडीचे मंत्री तीन दिवसांपासून वाराणसी आणि आसपासच्या परिसरात ठाण मांडून बसलेले आहेत. 

वाराणसीवर फोकस 
- वरीष्ठ पत्रकार श्रीधर अग्निहोत्री यांनी सांगितले की, वाराणसीवर फोकस करण्याचे कारण म्हणजे हा मोदींचा मतदारसंघ आहे. भाजपचे इतर ठिकाणांवर दिल्लीतूनच नजर ठेवली होती. 
- मध्य यूपीतील निवडणुकीच्या वेळी मोठ्या नेत्यांनी लखनौमध्ये तळ ठोकला होता. त्याचप्रमाणे पूर्वेच्या 89 जागांसाठी नेत्यांनी वाराणसीत तळ ठोकला होता. वाराणसीतूनच त्यांनी इतर जिल्ह्यांवर लक्ष ठेवले. 
- वाराणसीवर विशेष लक्ष देण्याचे आणखी एक कारण म्हणजे सध्या वाराणसीतील 3 जागा भाजपकडे आहे. त्यात या जागा वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. तसेच पूर्वेकडील 89 जागाच भाजपचे भवितव्य ठरवणार आहेत. 

वाराणसीत 8 जागा 
- वाराणसीमध्ये विधानसभेच्या 8 जागा आहेत. त्यात पिंडरा- काँग्रेस, अजगरा (सु)- बसपा, शिवपूर-बसपा, वाराणसी उत्तर-बीजेपी, वाराणसी दक्षिण- बीजेपी, वाराणसी कँट- बीजेपी, सेवापुरी-सपा कडे आहे. 
- रोहनिया सीट 2012 मध्ये अपना दल कडे होते. पण बाय इलेक्शनमध्ये ही जागा सीट सपाकडे गेली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...