Home »National »Other State» Pm Narendra Modi Launch Kochi Metro

कोचीत पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन, घेतला प्रवासाचाही आनंद

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 15:34 PM IST

  • उद्घाटन समारंभास ई. श्रीधरणही उपस्थित होते.
कोची-केरळमधील पहिल्या मेट्रो रेल्वेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मोदी यानी यावेळी पलारिवट्टम रेल्वे स्थानकापासून पथादिपल्लम स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास केला. ऑगस्टमध्ये ही सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरु करण्याता येईल. उद्घाटन समारंभ जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झाला. पंतप्रधान मोदींसोबत मेट्रो मॅन ई. श्रीधरनही यावेळी उपस्थित हाेते. यापुर्वी त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नव्हते ज्यावर विरोध पक्षांनी आक्षेप नोंदविला होता. कोची मेट्रोच्या एमडींनी याबाबत म्हटले होते की अंतिम यादी पीएमओने तयार केली होती.
स्थानकांच्या छतावर लावण्यात येत आहेत सोलर पॅनल

- 25 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्यात मेट्रो पलारिवट्टोम आणि अलुवा दरम्यान 13 किलोमीटर अंतर धावणार आहे. अन्य ठिकाणी अद्यापही काम सुरु आहे.
- कोची मेट्रोच्या सर्व स्थानकांच्या छतावर सोलर पॅनल लावण्यात आले आहेत.
- मोदी यांच्या समवेत या उद्घाटन समारंभास व्यंकय्या नायडू, राज्यपाल पी. सतशिवम, सीएम पी. विजयन, विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथला, एर्नाकुलमचे खासदार केवी थॉमस आणि मेट्रो मॅन ई. श्रीधरन उपस्थित होते.

Next Article

Recommended