आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श ग्राम योजनेचे उद्घाटन, आपले-सासरचे गाव निवडू नका पंतप्रधानांचे खासदारांना आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आदर्श ग्राम योजनेचे उद्घाटन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले. जयप्रकाश नारायण आणि महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी खासदारांनी या योजनेचे नेतृत्व करावे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले.
ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयाचा प्रभार असणारे नितिन गडकरी यांनी सुरुवातीला योजनेबाबत मार्गददर्शन केले. यावेळी योजनेच्या मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशनही मोदींच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहा अखेरच्या स्लाइडवर..
मोदी म्हणाले, पर्यटनस्थळाप्रमाणे करा गावांचा विकास
बदलत्या युगानुसार योजना आल्या पाहिजे. प्रक्रिया अधिक चांगल्या होण्यासाठी नवनविन गोष्टी करायला पाहिजे. भारतात अनेक अशी गावे आहेत जिथे पाऊल ठेवल्यानंतर वेगळेपण वाटते. पण काही मोजक्याच गावांची प्रगती झाली. तेथील नेत्यांच्या विचारामुळे हे शक्य झाले. जयप्रकाश नारायण यांची आज जयंती आहे. त्यांनी स्वताला राजकारणापासून वेगळे ठेवले. महात्मा गांधींच्या वाक्यात नेहमी गावांचा उल्लेख यायचा. त्यामुळे ही योजना त्यांची स्वप्न पूर्ती आहे.
जशी खासदारांच्या माध्यमातून ही योजना राबवली जात आहे. त्याचप्रमाणे राज्ये आमदारांच्या माध्यमातूनही ही योजना राबवू शकातात. त्यामुळे आणखी काही गावे यात जोडली जाऊ शकते. विकासाचे मॉडेल टॉप टू बॉटम असावे अथवा बॉटम टू टॉप यावर चर्चा सुरु आहे. पण आपण बॉटमला राहून काही तरी सुरुवात करु शकतो.
खासदार स्वतःच्या गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतो. पण त्याचा भरपूर वेळ हा अनेक समस्या सोडवण्यात जात असतो. या माध्यमातून खासदारांनी सुरुवात केल्यास सर्व अडचणी त्यांना प्रत्यक्ष लक्षात येतील. त्यानंतर ख-या अर्थाने बदल घडायला सुरुवात होईल. सध्या योजना आणि त्याचा फायदा याचा विचारच केला जात नाही. या योजनेमुळे खासदाराचा थेट गावांशी संपर्क येईल. यात खासदारांना स्वातंत्र्य असणार आहे. केवळ स्वतःचे गाव आणि सासरचे गाव वगळता खासदाराला कोणतेही गाव निवडता येईल.

आजपर्यंतची सर्वात मोठी अडचण म्हणजे योजना आहे तशी राबवली जाणार नाही. तर गावाची गरज असेल त्याप्रमाणे योजना आखून ती राबवली जाईल. हे काम फारसे अवघड नाही. केवळ आपली दृष्टी बदलावी लागणार आहे. खासदार राजकीय कार्यक्रम घेतात. पण त्यांनी या गावांत जाऊन कौटुंबीक वातावरण तयार करावे. संपूर्ण कुटुंबाबरोबर गावात जाऊन राहावे.
गावातील लोकांच्या कलाने काम करायला हवे. सरकारने किंवा प्रशासनाने हुकूमशाही प्रमाणे काम करता कामा नये. खासदारांनी अशी गावे घडावावी जेथे त्यांना आपल्या नातेवाईकांना फिरायला घेऊन जाता येईल. जयप्रकाश नारायण म्हणायचे, लोकशाहीत राजकारण हे अनिवार्य असते. पण घाणेरड्या राजकारणाऐवजी विकासाचे राजकारण केल्यास आपोआप विकासाचा मार्ग सापडतो.
या योजनेच्या अनुभवानंतर जेव्हा खासदार संसदेत मते मांडतील, तेव्हा कितीही बहुमताचे सरकार असले तरी त्या सरकारला खासदाराचे ऐकावेच लागेल.
जनआंदोलनाप्रमाणे राबवा योजना-गडकरी
त्याआधी नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम आपले मत मांडले. देशात सामाजिक आर्थिक बदलासाठी खेड्यांचा विकास मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. केवळ सरकारी योजना ग्रामीण भागात पोहोचवणे हा या योजनेचा उद्देश नसून सर्व अंगाने ग्रामीण भागातील जीवन सुसह्य व्हावे. त्यांना सर्व गावातचसर्व अत्याधुनिक सुविधा पोहोचवणे हा उद्देश त्यामागे पंतप्रधानांचा असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. सामाजिक जबाबदारीने सर्व खासदांनी यात सहभाग घ्यावा असे पंतप्रधानांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. राजकारणातून समाजकारण हाच सरकारचा संकल्प आहे. त्याची एक चांगली सुरुवात करत आहोत. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण यांचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे खासदारांनी जनआंदोलनाप्रमाणे ही योजना राबवावी असे आवाहन नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
गावे समृद्ध झाली तर शहरांत झोपड्यांचे प्रमाण वाढणार नाही. त्यामुळे जोमाने या कामात झोकून देण्याची गरज नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
पुढील स्लाइड्सवर पाहा कार्यक्रमाचे PHOTO...
अखेरच्या स्लाइडवर पाहा कार्यक्रमाचा लाइव्ह VIDEO