आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Launch Soil Health Card In Rajasthan On Thursday News In Marathi

पंतप्रधान मोदी गुरुवारी लॉन्च करणार Soil Health Card, शेतकर्‍यांना होईल लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर/श्रीगंगानगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (19 फेब्रुवारी) देशातील शेतकर्‍यांसाठी 'सॉईल हेल्थ कार्ड' लॉन्च करणार आहेत. सिंचन क्षेत्रात 2.5 हेक्टर आणि असिंचन क्षेत्रातील प्रती 10 हेक्टर जमिनीसाठी शेतकर्‍यांना हेल्थ कार्ड दिले जाणार आहे. श्रीगंगानगरमधील सूरतगडमध्ये गुरूवारी दुपारी साडे बाराला हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमात नऊ राज्यातील 18 शेतकर्‍यांना 'कृषी कर्मण पुरस्कार' तर 14 राज्यांतील शेतकर्‍यांना उत्पादकता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमालाआठ राज्यांचे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री उपस्थित राहाणार आहेत.

पंतप्रधान झाल्यानतर नरेंद्र मोदी पहिल्यांदा राजस्थानचा दौरा करणार आहेत. मोदी गुरुवारी दुपारी दोन वाजता विशेष विमानाने सूरतगढला पोहोचतील. तेथून हेलिकॉप्टरने नगरपालिकेच्या स्टेडिअमवर उतरतील. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह आणि राज्याचे कृषीमंत्री सैनी उपस्थित राहाणार आहेत.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सॉईल हेल्थ कार्डचे फायदे...