आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pm Narendra Modi Launches 3 Major Insurance Pension Schemes

पंतप्रधानांनी लॉन्च केल्या तीन योजना, 12 रुपयांत मिळणार 2 लाखांचा अपघाती विमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामाजिक सुरक्षेशी निगडित असलेल्या 'पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना', 'पंतप्रधान जीवन ज्योति बीमा योजना' आणि 'अटल पेंशन योजना' या तीन योजनांचे उद्घाटन आज (ता.10) कोलकाता येथे केले.
जीवन ज्योति बीमा योजने अंतर्गत दोन लाखाचा जीवन विमा मिळेल तर, सुरक्षा बीमा योजने अंतर्गत दोन लाखांपर्यंतचा अपघाती विमा मिळू शकेल. या दोन्ही योजनांचा लाभ प्रत्येक व्यक्ती कोणत्याही बँकेत असलेल्या खात्याअंतर्गत घेऊ शकते.
'अटल पेंशन योजना' करयोग्य उत्पन्न नसलेल्या आणि घटनात्मक योजनांचा लाभ मिळत नसलेल्या खातेधारकांसाठी आहे.
या योजने अंतर्गत एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार आणि पाच हजार रुपये इतक्या रकमेच्या मासिक पेंशनचे पर्याय देण्यात आले आहेत. यासाठी वेगळा प्रीमियम द्यावा लागणार आहे. वयाच्या 40 वर्षांपर्यत तुम्ही या योजनेचे सदस्य होऊ शकता. वयाच्या 60 व्या वर्षीपासून तुम्हाला पेंशन मिळण्यास सुरूवात होईल.