आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी तर मजूर नंबर वन : पंतप्रधान नरेंद्र मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलिया/लखनऊ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:ला मजूर नंबर वन सांगत उत्तर प्रदेशातील बलियामध्ये गरिबांना मोफत गॅस कनेक्शन शेगडी देण्याची योजना ‘उज्ज्वला’ची सुरुवात केली. त्यांनी बीपीएल कुटुंबातील दहा महिलांना स्वत: कनेक्शन सुपूर्द केले. योजनेमध्ये आठ हजार कोटी रुपयांमध्ये तीन वर्षात दारिद्र्यरेषेखालील पाच कोटी कुटुंबांना लाभ देण्यात येणार आहे. याबरोबरच त्यांनी जगभरातील मजुरांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

मोदी म्हणाले की, मी बलियामध्ये निवडणुकीचा िबगुल फुंकण्यास नव्हे तर गरिबीविरुद्ध लढण्यासाठी आलो आहे. निवडणुकीचे िबगुल तर मतदार फुंकतात. मी बलिया यासाठी आलो आहे कारण येथील कमीत कमी कुटुंबांकडे घरगुती गॅसचा उपयोग होतो. आम्हाला गॅस कनेक्शनची संख्या वाढवायची आहे. येथे केवळ आठ टक्के बीपीएल कुटुंबांकडे गॅस कनेक्शन आहे. पूर्व भारताने पश्चिम भारताची बरोबरी केली तर देशातून गरिबी नष्ट होऊन जाईल.

या भागामध्ये जर विकास पोहोचला तर गरिबीशी लढण्यात आम्ही यशस्वी होऊ. २०१९ मध्ये जेव्हा महात्मा गांधी यांची १५० वी जयंती असेल तोपर्यंत गरिबांच्या घरात हे कनेक्शन पोहोचलेले असेल. तुम्ही मला प्रेम दिले, मी त्याचे कर्ज विकासाच्या माध्यमातून उतरवेल, असेही मोदी म्हणाले.

(फोटो : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या वेळी दारिद्र्यरेषेखालील एका महिलेला प्रतीकात्मक कनेक्शन देताना पंतप्रधान.)
बातम्या आणखी आहेत...