आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: केदारनाथची द्वारे उघडली, मोदींनी घेतले दर्शन; व्हीपींनंतर दुसरे पंतप्रधान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केदारनाथला येणारे नरेंद्र मोदी तिसरे पंतप्रधान आहेत. - Divya Marathi
केदारनाथला येणारे नरेंद्र मोदी तिसरे पंतप्रधान आहेत.
डेहरादून - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी केदारनाथ मंदिराचे दर्शन केले. कपाट उघडल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी दर्शन घेतले. मोदींनी गर्भगृहात रुद्राभिषेक केला. त्यानंतर पंतप्रधान मंदिर परिसरात असलेल्या भाविकांमध्ये गेले. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या काही अंतरावर हेलिपॅड तयार करण्यात आला होता. केदारनाथ दर्शनानंतर मोदी हरिद्वार येथील पतंजली योगपिठाच्या आयुर्वेदिक संशोधन केंद्राच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. रामदेव बाबांनी त्यांचा राष्ट्रऋषी म्हणून सन्मान केला. 
 
मोदींनी मंदिरात केली 20 मिनिट पूजा 
- केदारनाथ येथे लष्कराच्या बँडेने मोदींचे स्वागत केले. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर पायी चालत मोदींनी भाविकांची भेट घेतली. 
- येथे उपस्थित एका जवानाच्या कडेवरील बाळाला गोंजारत त्याचा लाड केला. यावेळी मोदींचा फोटो घेण्यासाठी उड्या पडल्या होत्या. 
- मोदींनी मंदिरात साधारण 20 मिनिटे पूजा केली. बाहेर आल्यानंतर त्यांना स्मृतीचिन्ह भेट देण्यात आले. 
- बुधवारी सकाळी 8.50 वाजता मंदिराचे कपाट उघडण्यात आले. मोदींनी भोलेनाथाचे दर्शन घेऊन रुद्राभिषेक केला. 
- मोदींच्या नंतर याच आठवड्यात पाच तारखेला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उत्तराखंडचा दौरा करणार आहेत. मुखर्जी केदारनाथसह बद्रीनाथ येथेही जाणार आहेत. 
 
पंतप्रधान असताना केदारनाथला येणारे मोदी तिसरे
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी सकाळी डेहराडूनच्या जॉलीग्रॅन्ट विमानतळावर उतरले. येथे राज्यपालांनी त्यांचे स्वागत केले. 
- मंगळवारी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि राज्याचे पर्यटनमंत्री सतपाल महाराज केदारनाथ येथे पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा आढावा घेतला होता. 
- मोदी हे तिसरे पंतप्रधान आहेत जे या पदावर असताना केदारनाथला पोहोचले आहेत. सर्वप्रथम इंदिरा गांधी आणि त्यानंतर व्ही. पी. सिंह पंतप्रधान असताना येथे आले होते. 
 
पुढील स्लाइडवर पाहा VIDEO आणि फोटो...
 
हे पण वाचा... 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...