आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधींनी स्वतः सांगितले होते, UP मध्ये तारा आहे वीज नाही - मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिर्झापूर येथे अखेरच्या आणि 7 व्या टप्प्यासाठी 8 मार्चला मतदान होणार आहे. - Divya Marathi
मिर्झापूर येथे अखेरच्या आणि 7 व्या टप्प्यासाठी 8 मार्चला मतदान होणार आहे.
मिर्झापूर - उत्तर प्रदेशातील निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची आज मिर्झापूर येथे जाहीर सभा झाली. मोदी म्हणाले, ही निवडणूक काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांच्यापासून मुक्त होण्याची संधी आहे. कोणाचे सरकार स्थापन होणार हा प्रश्न नाही तर, या तीन पक्षांपासून मुक्तीचा उत्सव आहे. पंतप्रधानांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीना एक वर्षापूर्वीच्या भाषणाची आठवण करुन दिली. ते म्हणाले, 'राहुल गांधी स्वतः मुर्झापूरच्या मणिहान येथील एका सभेत म्हटले होते की येथे तार असतात मात्र त्यात वीज नसते.' 

सभेला झालेल्या गर्दीकडे पाहात मोदी म्हणाले, 'आज तर तुम्ही कमालच केली. यूपीमध्ये जेथे जाईल तेथे विक्रमी गर्दी होत आहे. याच संख्येने तुम्ही मतदान करा.'
- कोणाचे सरकार स्थापन होईल हा प्रश्न नाही. हा लोकशाहीचा उत्सव आहे. यूपीत निवडणूक उत्सवापेक्षा कमी नाही. येथील जनतेसाठी सपा, बसपा आणि काँग्रेसच्या मुक्तीसाठीचा हा उत्सव आहे. 
- पंतप्रधान म्हणाले, 'उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठे राज्य आहे. हा जर एक स्वतंत्र देश असता तर लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील पाचवा सर्वात मोठा देश राहिला असता.'
- येथून बेरोजगारी, गरीबी संपली तर सहाजिकच देशाचाही विकास होणार आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...