आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Narendra Modi Rally Today Srinagar Under Security Blanket

काश्मीरमधील जनतेचे प्रेम विकासाच्या माध्यमातून परत करेन- पंतप्रधान नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(फोटोः श्रीनगरमधील जाहीर सभेत संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी)
श्रीनगर- काश्मीरमधील जनतेचे प्रेम विकासाच्या माध्यमातून परत करेन. विकासामुळे काश्मीरमधील सर्व समस्या सुटतील. काश्मीरमध्ये पर्यटनाला मोठी संधी आहे आणि पर्यटनातून अनेकांचा रोजगाराचा प्रश्न सुटणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडिअमवरील जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदा श्रीनगरला पोहोचले आहेत.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-कश्मीरमधील सांबा येथे जाहीर सभेत संबोधित केले. सांबाजवळील मोड येथे झालेल्या सभेत मोदी म्हणाले, जम्मू-काश्मीरमधील तरुण एके-47 चा भार वाहून वाहून थकले आहेत. आता त्यांना अँड्रॉइड वन हवे आहे. अँड्रॉइड वन हा गूगलचा एक प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून लेटेस्ट सॉफ्टवेअर्स आणि आद्ययावत हार्डवेअर असलेले स्मार्टफोन्स कमी किमती यूजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेतंर्गत काही हॅंडसेट्स भारतात लॉन्च केले जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.

तत्कालीन सरकारने जम्मू-काश्मीरमधील जनतेची दिशाभूल केली आहे. काश्मीरमधील लोकांनी आपल्याला प्रेम दिले आहे. आपण त्याची व्याजासह परतफेड करणार आहे. यावेळी मोदींनी दहशवादी हल्ल्यात शहीद झालेले ब्रिगेडियर राजेंद्र सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सांबा येथील सभेतील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे...
-जम्मू-काश्मीरमधील जनतेची साथ हवी आहे. कोणतेही सरकार भेदभाव करत नाही.
-जम्मू-काश्मीरमधील घराणेशाही संपुष्ठात आणून भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन करावे.
- जनतेच्या बोटामध्ये एके-47 पेक्षा जास्त शक्ती आहे. बुलेटला बॅलेटच्या जोरावर पराभूत केले जाऊ शकते, हे यापूर्वी काश्मीरमधील जनतेने दाखवून दिले आहे.
-तत्कालीन सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये भेदभाव केला आहे. सगळ्यांना समान हक्क मिळाला पाहिजे.
- भाजपला बहुमत द्या, कॉंग्रेसचा एकही उमेदवाराला निवडून देऊ नका.
- 12 लाख लोकांना स्थलांतरीत व्हावे लागले. त्यांची काय चूक आहे. त्यांना परत बोलावून त्यांचे पुन्हा बस्तन बसवले जाईल.

अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था....
श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडिअमवरील जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. जम्मू काश्मीरमध्ये पर्यटन विकासाला संधी असल्याचे मोदींनी सांगितले. पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर मोदी पहिल्यांदा श्रीनगरला पोहोचले आहेत.

मोदींच्या दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रीनगरला सर्वत्र छावणीचे रुप आले आहे. पुलवामामधील नूरपुरा भागात रविवारी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याने लष्कराची झोप उडाली आहे. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला आहे. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर स्वत: सुरक्षेचा आढावा घेत आहेत. दहशतवादी मोदींच्या सभेत घातपात घडवून आणण्याची शक्यता आहे.

शेर-ए- काश्मीर स्टेडिअमवर अटल‍ बिहारी वाजपेयींचीही झाली होती सभा...
श्रीनगरमधील जाहीर सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासभेसाठी भाजपने शेर-ए-काश्मीर स्टेडियमची निवड केली आहे. याच स्टेडिअमवर 18 एप्रिल, 2003 रोजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची सभा झाली होती. वाचपेयी यांनी काश्मीर मुद्यासह पाकिस्तानला मैत्रीचा हात दिलाहोता. पाकिस्ताननेही मोठ्या मनाने स्वागत केले होते. नंतर दोन्ही देशामध्ये शिखर वार्ता सुरु झाली होती. तोपर्यंत कारगिल युद्धही संपुष्टात आले होते.

डॉ.मनमोहन यांच्या सभेपूर्वीही झाला होता हल्ल्याचा प्रयत्न...
वाजपेयी यांच्यानंतर 2004 साली माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी शेर-ए- काश्मीर स्टेडियमवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सिंह यांच्या सभेच्या काही तासांपूर्वी दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. लष्काराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करून त्याचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला होता.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, श्रीनगरमधील अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था....