आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस आता लाफिंग क्लब बनले आहे असे वाटतेय, कांगडातील सभेमध्ये नरेंद्र मोदींनी केली टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रथमच गुरुवारी कांगडा येथे जाहीर सभा घेतली. याठिकाणी मोदी म्हणाले, मला वाटते की, काँग्रेस पक्ष लाफिंग क्लब बनला आहे. देशातून काँग्रेसला हटवण्यासाठी नागरिकांनी स्वच्छता अभियान हाती घेतले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये राज्यात एका टप्प्यात 9 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहेत. 

आणखी काय म्हणाले मोदी... 
- नरेंद्र मोदी म्हणाले, ही भूमी 24 व्या वर्षी इंग्रजांना नामोहरम करणाऱ्या रामसिंह पठानियांची धरती आहे, या धरतीला मी नमन करतो. तुम्ही 9 तारखेला बटन दाबून तुमच्या आवडीच्या सरकारला विजयी करणार आहात. ज्यांनी हिमाचल प्रदेशला लुटले, त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. 
- तुम्ही 9 तारखेला बटन दाबाल त्यावेळी पठानिया यांचे स्मरण नक्की करा. कारण जेव्हा तुम्हा स्वातंत्र्य चळवळीतील महापुरुषाला स्मरण करून बटन दाबाल चर चुकीचे बटन दाबूच शकणार नाही आणि योग्य सरकार तयार होईल. 

काँग्रेसकडे काहीही उरले नाही.. 
नरेंद्र मोदी म्हणाले, आज सकाळीच तुम्ही लोक एवढ्या संख्येने आला आहात. मी सर्वांचा आभारी आहे. काँग्रेसला मानावेच लागेल. त्यांच्या हाती काहीही उरलेले नाही, तरीही जनतेला स्पष्टीकरण देत आहेत. मला वाटतेय की, काँग्रेस आता लाफिंग क्लब बनले आहे. तुमचे मुख्यमंत्री कोणत्या मुद्द्यावर जामीनावर आहेत. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीही ते पक्षाचा जाहीरनामा दाखवत आहेत. म्हणताहेत सत्ता मिळाली तर भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर पावले उचलू. त्यामुळेच म्हणतो त्यांच्यात हिम्मत आहे, दुसऱ्या एखाद्या पक्षाचा नेता असता तर तोंड लपवून पळाला असता. 

हिमाचल प्रदेशचा निवडणूक कार्यक्रम..
एकूण जागा 68
मतदान - 9 नोव्हेंबर
निकाल 18 डिसेंबर 
 
हिमाचल प्रदेश निवडणुकीबाबतचे 5 फॅक्टस्
> 68 जागांसाठी 7,521 पोलिंग स्टेशन आहेत. 2012 मध्ये 7225 पोलिंग स्टेशन होते. 
> 200 व्हीलचेअर पोलिंग बूथ उपलब्ध असतील. दिव्यांगांसाठी रॅम्प तयार केले जातील. सर्व बूथ ग्राऊंड फ्लोअरवर ठेवण्याचा प्रयत्न. 
> 136 बूथ असे आहेत जे पूर्णपणे महिला सांभाळतील. 
> 30 इंच उंचीचे वोटिंग कंपार्टमेंट असतील. आधी ही उंची 24 इंच होती. 
> 28 लाख एवढा खर्च करण्याची उमेदवाराला मर्यादा. आचारसंहिता लागू. 
 
बातम्या आणखी आहेत...